ताज्या बातम्या नाशिक

नाशिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशन अध्यक्षपदी वासुदेव ललवाणी….नूतन कार्यकारिणी जाहीर…..

नाशिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशन अध्यक्षपदी
वासुदेव ललवाणी….नूतन कार्यकारिणी जाहीर…..

सिंधी समाजाला एकत्र जोडून ठेवणारी नाशिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशन च्या अध्यक्षपदी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक वासुदेव ललवाणी यांची निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष उद्धवदास बोधानी यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना पदभार सोपविला. रविवार 27 सप्टेंबर रोजी नाशिकरोड येथील कमल हेरिटेज याठिकाणी फेडरेशन ची बैठक चीफ पेट्रॉन कन्हैयालाल कलानी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

बैठकीत सर्वानुमते वासुदेव ललवाणी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. वासुदेव ललवाणी यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर उपस्थितांनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 


कार्यकारिणीत उपाध्यक्ष नानीक केशवानी, उपाध्यक्ष हरीश कटारिया, सह सचिव किशन परमाणी, सेक्रेटरी धनेश अडवाणी, खजिनदार कन्हैयालाल माखिजा, मीडिया प्रभारी सेवक दर्डा, सदस्य किशन अडवाणी, अमित तानी, हासानंद करमचंदानी, प्रेम हरयाणी, जियांद कटारिया, रमेश अडवाणी, नरेश फुलवाणी, जॉनी वलेचा आदींची निवड करण्यात आली. 1994 पासून नाशिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशन ची स्थापना जिल्ह्यातील सिंधी समाजाला एकत्र ठेवून समाजातील सदस्यांना निर्माण होणाऱ्या अडीअडचणी सोडवून योग्य मार्ग दाखविणे तसेच समाजातील भावी पिढीला दिशा देण्यासाठी सिंधी कार्यक्रम, सामूहिक जेनाऊ संस्कार, आरोग्य शिबिरे आदी सामाजिक कार्य अविरतपाणे सुरू आहे.

फेडरेशन अध्यक्षपदाची धुरा यापूर्वी 1994 ते 2010 साली अर्जुन खतपाल, 2010 ते 2019 शीतलदास बालानी, 2109 ते 2026 उद्धवदास बोधानी यांनी अध्यक्षपदी राहून फेडरेशनच्या माध्यमातून समाजकार्य उत्तमरित्या पुढे नेले. समाजाच्या एकजुटीसाठी कार्य करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष वासुदेव ललवाणी यांनी बोलतांना सांगितले. नूतन अध्यक्ष वासुदेव ललवाणी यांच्या नेतृत्वाखाली फेडरेशनच्या समाजकार्याला अधिक गती मिळणार आहे असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केले.

यावेळी भगवान मोटवानी, शंकर जयसिंगानी, महेश बनसिंगानी, जयराम कटारिया, महेश दर्याणी, मोहन आहुजा, दीपक तोलानी, राजेश गोधवानी, मुकेश वलेचा, तीर्थ वासवानी, हरीश तलरेजा यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *