ताज्या बातम्या नाशिक

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त युवासेनेच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४२ रक्तपिशव्यांचे संकलन…

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त युवासेनेच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४२ रक्तपिशव्यांचे संकलन…

नाशिकरोड : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त युवासेनेच्या वतीने मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी हनुमंत नगर, लोखंडे मळा, जेल रोड, नाशिकरोड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एकूण ४२ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.
रक्तदान हेच श्रेष्ठदान या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि मानवसेवेचा संदेश देण्यात आला.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना अभिवादन करत युवासेनेने सामाजिक कार्याचा आदर्श निर्माण केला.
या प्रसंगी शिवसेना उपनेते दत्ता नाना गायकवाड, नगरसेवक योगेश भाऊ गाडेकर, नगरसेवक योगेश भाऊ भोर, नगरसेविका मंगलाताई आढाव, नगरसेवक हेमंत भाऊ गायकवाड, बाळासाहेब कोकणे, रोशन भाऊ आढाव, युवासेना जिल्हाप्रमुख सागर भाऊ कोकणे, युवासेना जिल्हा सचिव आकाश उगले, प्रवीण चव्हाण, तसेच युवासेना पदाधिकारी अभिजीत गावते, संजय गोसावी, श्रीकांत चव्हाण, विनय खैरनार, हर्ष चव्हाणके आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सुदर्शन चंदनानी, विकास चव्हाणके, सागर पाटील आणि प्रतीक सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.


वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून जनसेवा करण्याचा युवासेनेचा संकल्प या शिबिरातून अधोरेखित झाला. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे, उपस्थित मान्यवरांचे आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व युवासैनिकांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *