बाभळेश्वर-कुडूस ४०० केव्ही हा वीजवाहिनी प्रकल्प गुरुवारी पूर्ण झाला असून, ही वीजवाहिनी सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे वीजपुरवठा सक्षम, स्थिर होणार असून, या वाहिनीवरून सुमारे ३ हजार मेगावॅटपर्यंत अतिरिक्त वीजवहन क्षमता उपलब्ध होणार आहे. त्याचा मुंबई, ठाणे, पालघर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना फायदा होणार असून या वाहिनीमुळे महामुंबईत आता ब्लॅक आऊट होणार नाही, असे महापारेषणकडून […]

