मानवत (जि.परभणी) :परभणी-मनमाड रेल्वे मार्गावरील मानवत रोड रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी सिग्नल यंत्रणेत बिघाड करून साईनगर शिर्डी एक्सप्रेस (रेल्वे क्र. १७२०६) रोखली. रेल्वे थांबताच चोरट्यांनी जनरल डबा आणि आरक्षित डब्यात प्रवेश करून दोन महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने लंपास केले. (रेल्वे पोलिसांचे म्हणणे की चोरट्यांनी खालूनच खिडकीद्वारे चोरी केली. मात्र, रेल्वे प्लॅटफॉर्मवर आली […]

