डॉ.प्रीती शहाणे यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर….
नाशिक (प्रतिनिधी) :- डॉ. शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर जिल्हा जळगाव यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या तापी पूर्णा उत्कृष्ट समाजसेवक राष्ट्रीय पुरस्कारासाठी डॉ.प्रीती कृष्णा शहाणे यांची निवड झाली आहे.

डॉ. उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर आणि उत्तर महाराष्ट्र प्रमुख डॉ. रमाकांत जाधव यांनी डॉ. प्रीती शहाणे यांच्या निवासस्थानी येऊन त्यांचे वडील डॉ. कृष्णा शहाणे यांचेकडे निवडपत्र दिले.
डॉ. प्रीती शहाणे यांनी एम्स तेलंगणा येथून एम.बी.बी.एस. पदवी पूर्ण केलेली असून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत तसेच त्यांनी वैद्यकीय विद्यार्थी संघटना तेलंगणाच्या अध्यक्षपदी काम केलेले आहे.
त्रंबकेश्वर येथे ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनात त्यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाईल.
डॉ. प्रीती कृष्णा शहाणे ही नाशिक कन्या नुकतीच हैदराबाद येथील AIIMS या भारत सरकारच्या अत्यंत नामांकित आणि मानांकित संस्थेमधून एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण झाली त्याबद्दल तिचे विशेष हार्दिक अभिनंदन. त्याबद्दल तिच्या आजपर्यंतच्या कामगिरीविषयी आढावा……….
वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय बंधुत्व संघटनेच्या तेलंगाना प्रदेशाध्यक्षपदी नाशिक कन्या कुमारी प्रीती कृष्णा शहाणे हिने भरीव कार्य केलेले आहे.
प्रीती कृष्णा शहाणे नाशिक येथील रहिवाशी असून नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ कृष्णा शंकर शहाणे आणि डॉ.सौ. जयश्री कृष्णा शहाणे यांची कन्या आहे. बेटी बचाव बेटी पढाव; या विषयावर तिचा खास अभ्यास असून याच विषयावर तिने अनेक ठिकाणी व्याख्याने दिलेली आहेत.
तिच्या याबहुआयामी कामगिरी बद्दल आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ यांच्या वतीने “नॅशनल एक्सलन्स अँवार्ड” तसेच राष्ट्रीय माणुसकी पुरस्कार अशा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने त्या या पूर्वी सन्मानित झाल्या आहेत.





