क्राईम ताज्या बातम्या

अमली पदार्थविरोधी विशेष मोहिमेंतर्गत नाशिक शहरात १०१ बंद गोदामे व कारखान्यांची तपासणी… अवैध अमली पदार्थांची निर्मिती, साठवणूक व विक्री रोखण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम….. तपासणीत संशयास्पद वस्तू आढळल्या नाहीत….

 

अमली पदार्थविरोधी विशेष मोहिमेंतर्गत नाशिक शहरात १०१ बंद गोदामे व कारखान्यांची तपासणी…
अवैध अमली पदार्थांची निर्मिती, साठवणूक व विक्री रोखण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम….. तपासणीत संशयास्पद वस्तू आढळल्या नाहीत….

 

नाशिक शहरात अवैध अमली पदार्थांची छुप्या पद्धतीने होणारी साठवणूक व निर्मिती रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण १०१ बंद गोदामे व कारखान्यांची तपासणी करण्यात आली.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, अमली पदार्थांची अवैध निर्मिती, साठवणूक व विक्रीला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने ही विशेष मोहीम आयोजित करण्यात आली होती. २५ नोव्हेंबर रोजी पोलीस उपायुक्त तसेच परिमंडळ १ व २ च्या पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही तपासणी मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर, मुंबई नाका, सातपूर, अंबड, इंदिरानगर, एमआयडीसी, उपनगर, नाशिकरोड आणि देवळाली कॅम्प या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील बंद गोदामे व कारखान्यांची तपासणी करण्यात आली.

या विशेष तपासणीदरम्यान एकूण १०१ बंद गोदामे व कारखान्यांची पाहणी करण्यात आली. मात्र, कोणत्याही ठिकाणी संशयास्पद वस्तू अथवा अमली पदार्थांशी संबंधित बाबी आढळून आल्या नाहीत.
अवैध अमली पदार्थांची निर्मिती, साठवणूक आणि विक्रीला आळा घालण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामार्फत अशा प्रकारच्या विशेष मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असून, अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायात सहभागी असणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *