ताज्या बातम्या नाशिक

सोयाबीन शेतात बिबट्याचे दर्शन….. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण……

सोयाबीन शेतात बिबट्याचे दर्शन….. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण……

पळसे कारखाना परिसरात सायंकाळच्या सुमारास नागरिकांना बिबट्याचे दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नाशिक सहकारी साखर कारखान्याचा परिसर सध्या बिबट्यांच्या वावराने अधिकच गजबजला असून या भागात मकाच्या पिकांचे वाढलेले उत्पादन जेमतेम उसाचे पीक ओडे नाले व नदीचा काठचा परिसर बिबट्यांना आश्रयासाठी असणारे नाले झुडप्यांच्या जागा या बिबट्यांच्या प्रजनन काळात बिबट्यांना उपयोगी पडत असल्याने या भागात बिबट्यांची संख्या दरवर्षी वाढतच आहे बिबटे वाढल्याने दिवसाढवळ्या बिबट्या दिसण्याचे प्रकार नागरिकांना नवीन नव्हते परंतु सायंकाळच्या सुमारास नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या लगतच असलेल्या सुनील आगळे अभि गायधनी विनायक गायधनी यांच्या सोयाबीन शेतात सायंकाळच्या सुमारास बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

नागरिकांनी बिबट्याचे चार पाठलाग केला असता बिबट्याने पार्ले कारखान्याच्या परिसरातील अडचणीच्या ठिकाणी धूम ठोकले. या भागात वनखात्याने पुन्हा पिंजरा लावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे यापूर्वी नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या रस्त्यालगतचा गायखे सरोदे मळा नरवडे मळा सिताई लॉन्स परिसरामध्ये तसेच सोमाया नगरच्या आदी वर्षभरात भागात अनेक वेळा बिबट्या दिसून आला आहे. वन खात्याने पिंजरा लावा अशी मागणी परिसरातील नितीन गायधनी संदीप गायधनी विनायक गायधनी अभी गायधनी सुनील आगळे तुषार गायधनी दिलीप गायधनी आदी नागरिकांनी केली आहे

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात सर्वाधिक बिबटे असल्याचे नागरिकांनी सांगितले. नागरिकांनी सायंकाळच्या सुमारास लहान मुले बारीक जनावरे पाळीव कुत्रे यांची काळजी घ्यावी असे आवाहन गावचे पोलीस पाटील सुनील गायधनी यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *