नाशिक-त्र्यंबक महामार्गावरील पिंपळगाव बहुला पुलाच्या कामामुळे पुढील ४ दिवस वाहतुकीत मोठा बदल…असे असतील पर्यायी मार्ग….
नाशिक-त्र्यंबक रोडवरील पिंपळगाव बहुला येथील नंदिनी नदीवरील पुलावर गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे संभाव्य वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी नाशिक शहर वाहतूक शाखेने २४ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२६ या चार दिवसांच्या कालावधीत या मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. पोलीस उप आयुक्त (मुख्यालय/वाहतूक) चंद्रकांत खांडवी यांनी यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
कधी राहणार वाहतूक बंद?
दिनांक २४/११/२०२६ ते २७/११/२०२६ या कालावधीत दररोज खालील तीन टप्प्यांत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
सकाळी: पहाटे ०५:०० ते ०६:०० वाजेपर्यंत
दुपारी: ०१:०० ते ०२:०० वाजेपर्यंत
दुपारी/सायंकाळी: ०३:३० ते ०४:३० वाजेपर्यंत
वाहतूक बंद असलेले आणि पर्यायी मार्ग..
त्र्यंबकेश्वरकडून नाशिककडे येणारी वाहतूक.
पिंपळगाव बहुला जकात नाका येथून पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील. ही सर्व वाहतूक महिरावणी येथे वळवून (डायव्हर्जन) गिरणारे मार्गे नाशिककडे पाठवली जाईल.
नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहतूक
पिंपळगाव बहुला बस स्टॉप येथून पुढे जाण्यास मज्जाव असेल. ही वाहतूक अतुल चौक येथे वळवून अशोकनगर – सातपूर – बांदात फाटा मार्गे त्र्यंबकेश्वरकडे जाईल.
पोलीस प्रशासनाचे आवाहन:
कामाच्या ठिकाणी कंत्राटदाराने बॅरिकेडिंग, रिफ्लेक्टर आणि दिशादर्शक फलक लावावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन अधिनियम आणि मुंबई पोलीस अधिनियमांतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे. नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





