ताज्या बातम्या नाशिक

नाशिक पोलिसांचा गुन्हेगारी टोळ्यांना दणका… नाशिकरोडच्या कुख्यात ‘पिवाल टोळी’वर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई….

नाशिक पोलिसांचा गुन्हेगारी टोळ्यांना दणका… नाशिकरोडच्या कुख्यात ‘पिवाल टोळी’वर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई….

नाशिक शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने गुन्हेगारांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. शहरात दहशत पसरवणाऱ्या नाशिकरोड परिसरातील अर्जुन सुरेश पिवाल आणि त्याच्या संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का – MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त मा. संदीप कर्णिक यांनी या कारवाईला मंजुरी दिली आहे.

 

नाशिकरोड येथील गोसावीवाडी भागात गंगोत्री जनता स्टोअर्ससमोर १६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमित अरुण पगारे याच्यावर भररस्त्यात गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली होती. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्याचा सखोल तपास करताना पोलिसांनी हत्येचे नियोजन, प्रत्यक्ष गोळीबार, अग्निशस्त्रांचा पुरवठा, वाहतूक तसेच घटनेनंतरच्या हालचालींचा बारकाईने माग काढला. टोळीतील सदस्यांच्या सक्रिय भूमिका, त्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड आणि संघटित स्वरूप तपासून या टोळीविरुद्ध ‘मोक्का’ लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी आतापर्यंत एकूण १६ आरोपींना अटक केली असून, फरार असलेल्या अन्य ७ आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली वाहने, अग्निशस्त्रांशी संबंधित साहित्य, जिवंत काडतुसे, मोबाईल फोन, सिमकार्ड आणि इतर महत्त्वाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलीस आयुक्त . संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली
किरणकुमार चव्हाण (पोलीस उप आयुक्त, गुन्हे)

किशोर काळे (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२)

संदिप मिटके (सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे)
अद्विता शिंदे (सहाय्यक पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग)

योगेश देशमुख (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मध्यवर्ती गुन्हे शाखा)

जितेंद्र सपकाळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नाशिक रोड पोलीस ठाणे)
धनाजी माळोदे (पोलीस उप निरीक्षक, मध्यवर्ती गुन्हे शाखा)
किरण अहिरराव (पोलीस हवालदार, मध्यवर्ती गुन्हे शाखा)
नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर किंवा संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *