गुन्हेगारी

पुण्यात व्यावसायिकाची निवृत्त एसीपीकडून तब्बल अडीच कोटींची फसवणूक; धमकी दिल्याचाही आरोप

जमीन खरेदीत मोठा फायदा करून देण्याच्या बहाण्याने एका निवृत्त सहायक पोलिस आयुक्ताने व्यावसायिकाची तब्बल २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच, एका व्यक्तीच्या नावाने खोटे बँक खाते उघडून आणि बनावट कंपनीच्या नावाने व्यवहार करून रक्कम उकळल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी त्याची पत्नी, मुलासह पाच जणांविरोधात चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशील शंकरराव कदम, नंदा कदम, अनिकेत कदम (तिघेही रा. तळवलकर जिमसमोर, फर्ग्युसन रस्ता), दत्ता केदारी (रा. बोरज, जि. पुणे) आणि बाळासाहेब आर. वाळुंज (रा. कामशेत, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

अभिजीत विलास उंद्रे (वय ३५, रा. मांजरी खुर्द) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. ही घटना डिसेंबर २०१६ ते २१ मे २०२५ या कालावधीत घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशील कदम हा पुणे पोलिस दलातून सहायक पोलिस आयुक्त म्हणून निवृत्त झाला आहे. तक्रारदार हे व्यावसायिक आहे. कदम याने मुंबई येथील बालकिशन गुप्ता यांची खेड तालुक्यातील बोरज येथे मोक्याच्या ठिकाणी १२ एकर जमीन असून, ती विक्रीसाठी असल्याचे तक्रारदार यांना सांगितले. त्या जमिनीत गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा होईल, असे आमिष दाखवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *