खानदेश

नंदुरबार

हसन मुश्रीफ यांच्याकडे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रिपद

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे बुधवारी नंदुरबारचे पालकमंत्रिपद सोपविण्यात आले. राज्यात नव्याने महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुश्रीफ यांच्याकडे कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले नव्हते. मंत्री मुश्रीफ यांनी यापूर्वी कोल्हापूरसह अहिल्यानगर, वाशिम, रत्नागिरी व बुलढाणा या जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद भूषविले आहे. आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आहेत. तोंडावर १ मे आहे. शिवाय नवीन आर्थिक वर्ष […]

जिच्यासोबत प्रेमसंबंध तिच्याच पतीने दगडाने ठेचले, अनोळखी मृतदेहाची टॅटूमुळे पटली ओळख

जळगाव

पेट्रोलसाठी पहाटे ५ पासून नागरिक रांगेत, चिंता वाढली!

आखातातील युद्धाची झळ बसत असतानाही भारतात सध्या पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू आहे, असे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जात आहे, तरी पेट्रोल-डिझेल संपल्याच्या अफवांमुळे देशात काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोलपंपांवर नागरिकांनी सोमवारी रात्री आणि मंगळवारीही रांगा लावल्या होत्या. त्यामुळे काही ठिकाणी पेट्रोलपंप बंद करावे लागले, तर काही ठिकाणी वादावादीच्या घटनाही घडल्या. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पेट्रोलपंपांवर तुफान गर्दी उसळली. उन्हाच्या […]

“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत

मराठवाडा

हिंगोली

परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव

हिंगोली/परभणी/नांदेड: मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांना आज, शनिवारी (दि. ११) सकाळी ८:४५ ते ८:४६ च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हा धक्का ४.७ रिश्टर स्केल असल्याची माहिती आहे. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली शहर, वसमत, औंढा आणि कळमनुरी तालुक्यात धक्के बसताच नागरिक घराबाहेर पडले. त्यानंतर लगेचच परभणी शहर व जिल्ह्याच्या काही भागांत आणि नांदेड जिल्ह्यातही […]

कारसह साडेआठ लाखांचा गुटखा पकडला; एकाला अटक

गर्भपातानंतर रुग्णालयात धाव, डॉक्टरांच्या तत्परतेमुळे बालविवाहाचे क्रूर सत्य समोर; ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा

परभणी

परभणीत शिर्डी एक्सप्रेसवर दरोडा; सिग्नलची केबल कापून रेल्वे रोखली, महिलांचे दागिने ओरबाडले

मानवत (जि.परभणी) :परभणी-मनमाड रेल्वे मार्गावरील मानवत रोड रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी सिग्नल यंत्रणेत बिघाड करून साईनगर शिर्डी एक्सप्रेस (रेल्वे क्र. १७२०६) रोखली. रेल्वे थांबताच चोरट्यांनी जनरल डबा आणि आरक्षित डब्यात प्रवेश करून दोन महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने लंपास केले. (रेल्वे पोलिसांचे म्हणणे की चोरट्यांनी खालूनच खिडकीद्वारे चोरी केली. मात्र, रेल्वे प्लॅटफॉर्मवर आली […]

महामानवास अभिवादन : मध्यरात्री जयभीमच्या जयघोषाने नांदेड दणाणले…

महिला गुत्तेदाराला ६ लाखांच्या खंडणीसाठी राॅड, काठीने मारहाण, ६ जणांविराेधात गुन्हा दाखल

पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर

“मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण…!”

मला वाटते, खरातांचा (अशोक खरात) कुठेतरी काहीतरी एन्काऊंटर करतील, कारण खूप नावे समोर येणार आहेत. ज्यांच्याशी ते जोडले गेले आहेत. अशी शंका व्यक्त करत, आता जे सत्ताधारी आहेत, मंत्री आहेत, त्यांना घेऊनही ही नावे येणार आहेत, असा मोठा दावा काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. त्या सोलापूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन […]

अर्भक मृत्यू प्रकरणात ‘सिव्हिल’च्या डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर: सांगलीत ‘स्वीकृत’वरून राष्ट्रवादीच्या ३५ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

पुणे

वर्षात साडेपाच हजार पुणेकरांनी काढला आंतरराष्ट्रीय वाहन परवाना; परदेशात ड्रायव्हिंगची वाढली क्रेझ

: परदेशात स्वतः वाहन चालवत पर्यटन करण्याकडे पुणेकरांचा कल वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल ५ हजार ५५८ नागरिकांनी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना (आयडीपी) काढला असून, ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे अडीचशेने वाढली आहे. पुण्यातून परदेशात नोकरी, शिक्षण आणि पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे परदेशात […]

विधान परिषद निवडणूक: मविआमध्ये एकमत होण्याजोगी स्थिती नाही- चंद्रशेखर बावनकुळे

भोंदू खरातच्या ट्रस्टवरील विश्वस्त जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू

कोकण

सिंधुदुर्ग

वाळू माफियांचा ‘खेळ खल्लास’, प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ खास; रात्रभर चाललेल्या मोहिमेत १५ वाहने जप्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोफावलेल्या अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारींची जिल्हा प्रशासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने समन्वयाची भूमिका बजावत एका अत्यंत नियोजित ‘सर्जिकल स्ट्राईक’द्वारे वाळू माफियांना मोठा दणका दिला आहे. जिल्हा प्रशासनाच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. अवैध वाळू उपसा आणि […]

‘तिसऱ्या मुंबई’साठी भू-संपादन सुरू, एमएमआरडीए ऑनलाइन पद्धतीने घेणार जमीन मालकांची संमती

डंपरला विजेच्या तारेचा स्पर्श, चालकाचा जागीच मृत्यू; दापोलीतील घटना

मुंबई शहर

मुंबई पोलिस इतके असहाय कसे? मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

मुंबई – पाली विभागाला अनुदानित दर्जा देण्याच्या मागणीसाठी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये गेले कित्येक महिने आंदोलन करणाऱ्या बौद्ध भिक्खूला हटविण्यात पोलिस अपयशी ठरल्याने मुंबई उच्च न्यायालयाने पोलिस इतके असहाय कसे? असा सवाल गुरुवारी केला. मुंबई विद्यापीठातील पाली भाषा विभागाचे संवर्धन आणि वसतिगृहाच्या मागणीसाठी संशोधक विद्यार्थी तथा बौद्ध भिक्खू भंते विमांसा (राजेश बलखंडे) यांनी सप्टेंबर २०२५ […]

आता लक्ष अक्षय्य तृतीयेकडे, कोट्यवधींची गुंतवणूक अडकली; ऑफर्सवर भर

पालघरची विजेची चिंता मिटली

विदर्भ

वाशिम

शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण; अनुदानाबाबत विचारल्याने आला राग

मंगरुळपीर (वाशिम): तालुक्यातील गोगरी परिसरात मनरेगा योजनेंतर्गत संत्रा फळबागेचे अनुदान रखडल्याबाबत विचारणा करणाऱ्या शेतकऱ्याला तालुका कृषी अधिकाऱ्याने बुटाने व मातीच्या ढेकळाने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी दोन वर्षापूर्वी मनरेगा योजनेंतर्गत तीन एकर क्षेत्रावर संत्रा फळबाग लावली होती. या फळबागेसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान चार महिन्यांपासून रखडल्याचा त्यांचा आरोप आहे. […]

राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?

एसटीचा प्रवास महागला ! स्वच्छतेसाठी प्रवाशांकडूनच घेतले जातील दोन रुपये शिल्लक

भंडारा

मोहफुल वेचायला गेलेली महिला वाघाच्या हल्ल्ल्यात ठार

भंडारा : तुमसर वन परिक्षेत्रातील धनेगाव जंगल परिसरात मोहफुले वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या एका ५२ वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवारी सायंकाळी घडली. साधना सीताराम उईके (रा. धनेगांव) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ​मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, साधना उईके या , १७ एप्रिल रोजी सकाळी […]

माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती

संघाच्या ‘झेड प्लस’ सुरक्षेचा खर्च वसूल करण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली

“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले

विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे. पण महायुतीने एक जादाचा उमेदवार दिला तर अटीतटीची लढत होऊ शकते. उद्धव ठाकरे २०२० मध्ये विधान परिषद सदस्य झाले. त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत असताना ते पुन्हा सभागृहात येतील का? याबाबत कमालीची उत्सुकता आहे. त्यांनी पुन्हा एकदा आमदारकी घ्यावी, असा त्यांच्या पक्षात आग्रह असल्याचे म्हटले जाते. विधिमंडळातील पक्षाची घडी नीट राहावी, यासाठी त्यांचे आमदार होणे गरजेचे आहे, असा मतप्रवाह पक्षात आहे. आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याबाबत उत्कंठा आहे. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर

“गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने…”; आदित्य ठाकरेंचा निशाणा

गेले काही दिवस चर्चेचा विषय ठरलेले महिला आरक्षणाशी संबंधित संविधान (१३१वी दुरुस्ती) विधेयक केंद्र सरकारला लोकसभेत शुक्रवारी मंजूर करून घेता आले नाही. २१ तासांच्या चर्चेनंतर या विधेयकावर झालेल्या मतदानात बाजूने २९८ व विरोधात २३० मते पडली. घटनादुरुस्ती विधेयक संमत होण्यासाठी सभागृहातील सदस्यसंख्येच्या दोन तृतीयांश मते मिळणे आवश्यक होते; पण तो आकडा सत्ताधाऱ्यांना गाठता आला नाही. २०१४ पासूनच्या सत्ताकाळात मोदी सरकारला सभागृहात एखादे विधेयक संमत करता न आल्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. "संविधानातील हा हस्तक्षेप भारतातील लोकशाहीसाठी पर्यायाने संविधानाकरिताही मारक ठरला असता, पण हा प्रयत्न विरोधी पक्षाच्या खासदारांच्या एकजुटीमुळे फेटाळण्यात आला" असं

“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेससारख्या पक्षांच्या स्वार्थी राजकारणाचा फटका देशातील महिलांना बसला. या साऱ्या घटना २१व्या शतकातील महिला पाहात आहेत आणि त्या योग्यवेळी उत्तर देतील अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केली. या टीकेला आता काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणण्याचा प्रयत्न करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्राला संबोधण्याच्या नावाखाली देशातील जनतेला प्रचारकी थाटातील आपले भाषण ऐकवले. ३० मिनिटांच्या भाषणात मोदीजींनी ५८ वेळा काँग्रेसचे नाव घेतले आणि आपल्या नेहमीच्या सवयीने त्यांनी खोटे दावे केले. महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणून देशाची निवडणूक संरचना बदलून संविधान आणि लोकशाही मोडीत काढण्याचा

“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून काल भाषण केले,ते देशाच्या पंतप्रधानांचे नव्हते तर भाजपच्या नेत्याचे आणि आचारसंहितेचे उल्लंघन करणारे भाषण होते, अशी जोरदार टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पाच राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने रचलेल्या कट कारस्थानांचा'वर विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधानांनी आपल्या भाषणात ५० हून अधिकवेळा काँग्रेसचे नाव घेतले. यावरून भाजपला काँग्रेसची किती भीती वाटते हे स्पष्ट होते. पंतप्रधानांचे हे भाषण राजकीय प्रचारासारखे असून त्यांनी आचारसंहितेच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. काँग्रेसने देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती, पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष आणि महिला पंतप्रधान दिल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षणही काँग्रेसनेच दिले. २०२३

“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस

उद्धवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा आम्ही उघड करू. आम्ही महिलांचे एकत्रीकरण करणार आहोत. लोकशाहीत जनमताचा रेटा यांच्या लक्षात येईल, तेव्हा हे महिला आरक्षणाला पाठिंबा देतील. महिलांना संघटित करण्याचे काम करण्यासह राज्यातून १ कोटी महिलांच्या सह्या गोळा करणार आहोत, जनजागृती करणार आहोत. आम्ही मेळावा बोलावला आहे. तिथे आमच्या मित्र पक्षांना निमंत्रित करू. महिलांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते. महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेत नामंजूर झाल्याच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडली. गृहमंत्र्यांनी

महिला आरक्षण: सुप्रिया सुळेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले; म्हणाल्या, “वेळ-जागा सांगा”

मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणचा संबध काय? ५४३ सदस्यांमध्ये महिला आरक्षण द्या. आम्ही त्याचा विरोध कधीच करणार नाही. अनेक देशात सध्या अराजकता माजली आहे, त्यात तुम्ही विधेयक आणले. महिला आरक्षणाला आमचा विरोध नाहीच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या विषयाच्या संदर्भात डिबेट करायला तयार आहे. त्यांनी जी जागा सांगावी आणि वेळ सांगावी, असे सांगत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांचे आव्हान स्वीकारले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षणावरून विरोधकांवर जोरदार टीका केली. या टीकेला सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले. पत्रकारांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, भाजपा महिला आरक्षणाच्या संदर्भात आंदोलन करायला तयार असेल, तर
जाहिरात साठी संपर्क करा. - 8484888522
मालेगाव

पांझरापोळ संस्था पुन्हा संघर्षाच्या पवित्र्यात

शहरातील नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पांझरापोळ संस्थेच्या जागेलगत असलेल्या नैसर्गिक नाल्यावर थाटलेली अतिक्रमणे काढण्याऐवजी, अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करण्याचा नावाने त्या जागी आणखी नवीन गाळे बांधण्याचा घाट महानगरपालिकेतर्फे घालण्यात आल्याचा गंभीर आरोप पांझरापोळ संस्थेने केला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नऊ वर्षांपूर्वी यासंदर्भात दिलेले आदेश धाब्यावर बसवून महापालिका प्रशासन मनमानी […]

इगतपुरी

रखडलेल्या बिलांसाठी संतप्त ठेकेदारांकडून रास्ता रोको आंदोलन

इगतपुरी तालुक्यातील महत्वाच्या गावांमध्ये ठेकेदारांनी दळणवळणासाठी स्व खर्चाने रस्ते बनवले. त्या मार्गाने सुरळीत वाहतुकही सुरु झाली. मात्र २०२३ पासून त्या सर्व कामांची बिले अदा झालेली नाही. त्यामुळे अनेक ठेकेदारांना कर्जाचा डोंगर घेऊन अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तयार केलेले रस्ते हे ठेकेदारांनी स्वखर्चाने कर्जबाजारी होऊन केलेले असून शासनाने अद्याप त्यापोटी बिल दिले नाही. म्हणून आज […]

त्र्यंबकेश्वर

एन्ट्री गावकऱ्याची, दर्शन भाविकाला! त्र्यंबकेश्वरमधील ‘व्हीआयपी’ लूट उघड

बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन करून देण्यासाठी काही खास दलाल अर्थात एजंट कार्यरत होते. रांगेत थांबलेल्या भाविकांशी ते संपर्क साधून जलद दर्शन करून देण्यासाठी दर निश्चित करायचे. नंतर संशयित विश्वस्त पुरूषोत्तम कडलगचे पुतणे अभिषेक व ओम कडलग यांच्याशी संपर्क साधून संबंधित भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था त्यांच्याच मदतीने करून दिली जात असत. अवघ्या काही […]

नाशिक

“…तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल”; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती

भोंदू अशोक खरातला पाचव्या गुन्ह्यात रविवारी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. खरातला व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. लैंगिक शोषण आणि फसवणूकप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी खरातच्या खांद्याची सर्जरी झाली असून, त्याचं डोकंही दुखत आहे. पेनकिलर गोळ्या, औषधांनी त्याला फारसा फरक पडत नसल्याने आता वैद्यकीय तपासणीसाठी मेंदूविकार तज्ज्ञांकडे घेऊन जावे लागल्यास नवीन अर्ज करण्याची […]

विद्यार्थी कॉर्नर

योजना : आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

तळोदा : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना  परदेशात उच्च शिक्षण देण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार असून या योजनेच्या लाभ घेण्यासाठी तळोदा प्रकल्प कार्यालयाची संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.          महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी विशेष शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी ४० विद्यार्थ्यांना पीएचडी, पदव्युत्तर […]

विद्यार्थी कॉर्नर

तरुणांनो, स्वयंरोजगाराकडे वळा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

पणजी : ‘देशातील इतर भागांप्रमाणेच गोव्यातही तरुण पांढरपेशा नोकऱ्या शोधतात. परंतु सर्वाना सरकार नोकऱ्या देऊ शकत नाही. त्यामुळे युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळावे,’ असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘सुमारे ७० हजार सरकारी कर्मचारी गोव्यात आहे. ही संख्या आणखी वाढवता येणार नाही. युवा वर्गाने उद्योजकतेकडे […]

विज्ञान-तंत्रज्ञान

Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक

जर तुम्ही रोजच्या वापरासाठी गुगल क्रोम ब्राउझर वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारताची सायबर सुरक्षा संस्था CERT-In ने क्रोममधील गंभीर बगबाबत इशारा दिला आहे. या त्रुटीचा फायदा घेत हॅकर्स तुमच्या संगणकावर दूरून नियंत्रण मिळवू शकतात. CERT-Inच्या अहवालानुसार, क्रोमच्या काही जुन्या व्हर्जनमध्ये गंभीर सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत. या बग्समुळे हॅकर्स तुमच्या सिस्टममध्ये […]

विज्ञान-तंत्रज्ञान

एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला

देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किमतीत गुपचूप वाढ केली आहे. कंपनीने आपल्या सर्वात लोकप्रिय अशा ८४ दिवसांच्या प्लॅनची किंमत वाढवली असून, काही स्वस्त प्लॅन्स बंद करून ग्राहकांसमोर महागड्या रिचार्जचाच पर्याय ठेवला आहे. यामुळे सर्वसामान्य मोबाईल युजर्सचे बजेट कोलमडणार आहे. एअरटेलचा जो प्लॅन आधी ८५९ रुपयांना मिळत होता, त्यासाठी आता ग्राहकांना ८९९ […]

आरोग्य विशेष

कमी वयात मुलींना पाळी येऊ नये म्हणून ५ व्यायाम

काही वर्षांपुर्वीचा काळ असा होता की मुलींना साधारण त्या आठवी, नववी, दहावी या इयत्तांमध्ये गेल्यावर पाळी यायची. पण आता मात्र पाळी येण्याचं वय खूप अलिकडे आलं आहे. अगदी तिसरी, चौथीमध्ये शिकणाऱ्या मुलींना पाळी आल्याच्या कित्येक घटना कानावर येत आहेत. हे असं सगळं आजुबाजुला घडत असताना आपल्या लेकीच्या बाबतीत असं काही होऊ नये म्हणून कित्येक पालक […]

You cannot copy content of this page