क्राईम

क्राईम ताज्या बातम्या

लॉजच्या नावाखाली देहव्यापाराचा काळा बाजार; पोलिसांचा ‘अर्थपूर्ण’ काणाडोळा?.. परराज्य आणि ग्रामीण भागांतून तरुणींना जाळ्यात ओढून या दलदलीत ढकलले जातात.

लॉजच्या नावाखाली देहव्यापाराचा काळा बाजार; पोलिसांचा ‘अर्थपूर्ण’ काणाडोळा?..परराज्य आणि ग्रामीण भागांतून तरुणींना जाळ्यात ओढून या दलदलीत ढकलले जातात. ​नाशिकरोड परिसरात लॉजच्या नावाखाली कुंटणखाने थाटून सुरू असलेला देहव्यापाराचा गोरखधंदा आता चव्हाट्यावर आला आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसरात्र सुरू असलेल्या या काळ्या साम्राज्यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले असून, खाकीच्या भूमिकेवर गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. […]

क्राईम ताज्या बातम्या

५ गोवंशीय जनावरांची सुटका; अवैध कत्तलीच्या तयारीत असलेला आरोपी ताब्यात….

५ गोवंशीय जनावरांची सुटका; अवैध कत्तलीच्या तयारीत असलेला आरोपी ताब्यात…. भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई; महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल…. नाशिक | प्रतिनिधी नाशिक शहरात गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल व मांस विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत ५ गोवंशीय जनावरांची सुटका […]

क्राईम ताज्या बातम्या

जेलरोड भागात घरांवर दगडफेक……टवाळखोरांचा बंदोबस्त करा….. त्रस्त रहिवाशांची पोलिसांकडे मागणी.,…

जेलरोड भागात घरांवर दगडफेक……टवाळखोरांचा बंदोबस्त करा….. त्रस्त रहिवाशांची पोलिसांकडे मागणी.,… नाशिकरोड जेलरोड परिसरातील कॅनल रोडवरील राजीव गांधी नगर आणि इंगळे नगर भागात गेल्या महिनाभरापासून अज्ञात समाजकंटकांकडून घरांवर दगडफेक करण्याचे प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दगडफेकीमुळे महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून, संबंधित टोळक्याचा तातडीने शोध घेऊन […]

क्राईम ताज्या बातम्या

प्रवासी गाडीत चढताना महिलेची पर्स लंपास….आरोपी महिलेला अटक, साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने जप्त….

‎प्रवासी गाडीत चढताना महिलेची पर्स लंपास….आरोपी महिलेला अटक, साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने जप्त…. ‎ ‎नाशिकरोड रेल्वे स्थानकावर प्रवासी गाडीत चढत असताना गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधील सोन्याचे गंठण चोरी करणाऱ्या महिलेला जीआरपी आणि आरपीएफच्या संयुक्त पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे 4 लाख 50 हजार रुपये किमतीचे 30 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. […]

क्राईम ताज्या बातम्या

गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणारा अटकेत……गुंडा विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी……

‎ गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगणारा अटकेत……गुंडा विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी…… ‎ ‎नाशिक शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने नांदूर नाका परिसरातूनअवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला अटक करून त्याच्याकडून गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. १६ जून २०२६ रोजी नांदूर नाका परिसरात एक जण गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती राजेश […]

क्राईम ताज्या बातम्या

नाशिकरोडमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तक्रार केल्यास गल्ली जाळण्याची धमकी, गुन्हा दाखल…..

नाशिकरोडमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तक्रार केल्यास गल्ली जाळण्याची धमकी, गुन्हा दाखल….. नाशिकरोड | प्रतिनिधी नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तक्रार केल्यास संपूर्ण गल्ली जाळून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ११ जून रोजी सायंकाळी संबंधित मुलगी घरातील कचरा टाकण्यासाठी कचराकुंडीजवळ गेली असता संशयित मनोज डोगळे उर्फ […]

क्राईम ताज्या बातम्या

भद्रकाली पोलीस ठाण्याची धडाकेबाज कामगिरी… लॅपटॉप चोरणाऱ्या आरोपीला २४ तासांत ठोकल्या बेड्या….

भद्रकाली पोलीस ठाण्याची धडाकेबाज कामगिरी… लॅपटॉप चोरणाऱ्या आरोपीला २४ तासांत ठोकल्या बेड्या…. नाशिकच्या भद्रकाली पोलिसांनी एक मोठी आणि कौतुकास्पद कामगिरी केली आहे. ऑफिसचे कुलूप तोडून ३० हजार रुपयांचा लॅपटॉप चोरणाऱ्या अट्टल चोराला पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. रामचंद्र युवराज गुंभाडे (वय २० वर्षे, रा. दिंडोरी, सध्या रा. भद्रकाली, नाशिक) असं अटक करण्यात […]

क्राईम ताज्या बातम्या

नाशिकरोड पोलिसांची मोठी कारवाई एका विधी संघर्षित (अल्पवयीन) बालकाला घेतले ताब्यात…. अल्पवयीन चोरट्याकडून तब्बल १ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त….

नाशिकरोड पोलिसांची मोठी कारवाई एका विधी संघर्षित (अल्पवयीन) बालकाला घेतले ताब्यात….अल्पवयीन चोरट्याकडून तब्बल १ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त…. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानंतर नाशिकरोड गुन्हे शोध पथकाची गस्तीदरम्यान मोठी कारवाई….संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी रचला सापळा आणि घरफोडीचा गुन्हा झाला उघड…   नाशिकमधून एक धक्कादायक आणि तितकीच मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या […]

क्राईम ताज्या बातम्या

खाकीचा दणका: नाशिकरोड आणि वाकडमधील घरफोड्यांचा पर्दाफाश, ३५ लाखांच्या मुद्देमालासह सराईत चोरटा जेरबंद…. गुन्ह्यांचा अंधार कितीही गडद असला, तरी कायद्याचा सूर्य उगवतोच, हात फिरेल पोलिसांचा पाठीवर, तर गुन्हेगारांचे धाबे दणाणतातच…! नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने अत्यंत धडाकेबाज कामगिरी करत नाशिकरोड आणि पिंपरी-चिंचवडमधील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका सराईत आरोपीला बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून तब्बल ३५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सराफ बाजारात रचला सापळा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार नाशिकरोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक सराफ बाजार व संवेदनशील भागात गस्त घालत होते. याच दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी व त्यांच्या पथकातील अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली की, सराफ बाजारातील देवी चौक परिसरात एक संशयित इसम चोरीचे सोने विकण्यासाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वेळेचा अपव्यय न करता देवी चौक परिसरात अत्यंत शिताफीने सापळा रचला आणि संशयिताला ताब्यात घेतले. ३५ लाखांचे सोने जप्त पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याचे नाव सचिन भगवान सहजराव (वय २५, रा. ताथवडे, बदने वस्ती, ता. मुळशी, जि. पुणे) असे असल्याचे समोर आले. त्याची अंगझडती घेतली असता पोलिसांना थक्क करणारा मुद्देमाल मिळाला. त्याच्याकडून २३ तोळे सोन्याचे दागिने १ तोळा सोन्याची लगड एकूण किंमत: ३५,००,०००/- (पस्तीस लाख रुपये) चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुणे-नाशिकमधील गुन्हे उघड तपासादरम्यान समोर आले की, हा मुद्देमाल नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल गु.र.नं. ३१८/२०२६ आणि वाकड पोलीस ठाणे (पिंपरी चिंचवड) येथील गु.र.नं. २४०/२०२६ मधील घरफोडीचा आहे. आरोपीवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवादार सागर आडणे करत आहेत. या पथकाने केली कामगिरी ही धडक कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, पोलिस निरीक्षक अतुल चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि गुन्हे शोध पथकातील विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, संध्या कांबळे, अरुण गाडेकर, रोहित शिंदे आणि योगेश रानडे यांच्या पथकाने केली. पोलीस आयुक्तांनी या कामगिरीबद्दल पथकाचे कौतुक केले आहे.

खाकीचा दणका: नाशिकरोड आणि वाकडमधील घरफोड्यांचा पर्दाफाश, ३५ लाखांच्या मुद्देमालासह सराईत चोरटा जेरबंद…. गुन्ह्यांचा अंधार कितीही गडद असला, तरी कायद्याचा सूर्य उगवतोच, हात फिरेल पोलिसांचा पाठीवर, तर गुन्हेगारांचे धाबे दणाणतातच…! नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने अत्यंत धडाकेबाज कामगिरी करत नाशिकरोड आणि पिंपरी-चिंचवडमधील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका […]

क्राईम ताज्या बातम्या

गुंडा विरोधी पथकाची मोठी कारवाई …दोन सराईत गुन्हेगारांकडून ३ गावठी कट्टे आणि ३ जिवंत काडतुसे जप्त… मध्य प्रदेशातून आणले होते हत्यार…

गुंडा विरोधी पथकाची मोठी कारवाई …दोन सराईत गुन्हेगारांकडून ३ गावठी कट्टे आणि ३ जिवंत काडतुसे जप्त… मध्य प्रदेशातून आणले होते हत्यार… नाशिक शहरात अवैध हत्यारे बाळगणाऱ्या आणि त्यांची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात नाशिक शहर पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्व्ये गुंडा विरोधी पथकाने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करत दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या […]