नाशिक-मुंबई महामार्गावर कळवा येथील खारेगाव टोलनाक्याजवळ शनिवारी सकाळी एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार पती आणि पाठीमागे बसलेल्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. कल्पेश रेवाळे (३०) आणि मीनाक्षी रेवाळे (३१, रा. भांडुप) अशी मृत पावलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. याप्रकरणी कळवा पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कल्पेश आणि […]

