दापोली : डंपरला विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याचे चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. ३१) दुपारी १२:३० वाजण्याच्या दरम्यान दापाेलीतील जानाई मंदिर परिसरात घडली. अश्फाक हुसेन अराई (६०, रा. ताडील माेहल्ला, दापाेली) असे या चालकाचे नाव आहे. दापोली शहरातील माैजे दापाेलीतील जानाई मंदिर परिसरात रस्त्याच्या कामासाठी डंपरच्या साहायाने मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू होते. […]

