ताज्या बातम्या महाराष्ट्र

चिमुकल्या स्पंदनची माणुसकीची साद; पिग्मी बँकेतील १,६०० रुपयांचा मुख्यमंत्री सहायता निधीस हातभार…

चिमुकल्या स्पंदनची माणुसकीची साद; पिग्मी बँकेतील १,६०० रुपयांचा मुख्यमंत्री सहायता निधीस हातभार…

“वय लहान असले तरी मनात माणुसकीचा झरा मोठा असतो, समाजाचे दुःख पाहून जो हळहळतो, तोच खरा मोठा असतो!”

नाशिक :
दातृत्वाची भावना आणि सामाजिक बांधिलकी ही वयावर अवलंबून नसते, याचाच प्रत्यय नाशिकमधील सात वर्षीय चिमुकल्या स्पंदन अर्चना हेमंत सोनार याने दिला आहे. स्वतःच्या खाऊच्या पैशातून आणि छोट्या-छोट्या बचतीतून पिग्मी बँकेत साठवलेली १ हजार ६०० रुपयांची रक्कम स्पंदनने गरजूंच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द केली आहे.
“स्वतःच्या खेळण्यांचे स्वप्न बाजूला सारून त्याने माणुसकी जपली, चिमुकल्या स्पंदनच्या या दातृत्वाने आज अवघी माणुसकी जिंकली!”

नाशिकमधील जत्रा हॉटेल परिसरात राहणारा व ओझर येथील पोद्दार स्कूलमध्ये शिकणारा स्पंदन याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे ही रक्कम सुपूर्द केली. यावेळी उपजिल्हाधिकारी (प्रशासन) कुंदन हिरे उपस्थित होते. लहान वयात स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून समाजहितासाठी पुढे येण्याच्या स्पंदनच्या या संवेदनशीलतेचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विशेष कौतुक केले.

“फूल जरी लहान असले तरी त्याचा सुगंध दरवळत राहतो,

स्पंदनचा हा छोटासा हातभार आज समाजाला मोठी प्रेरणा देऊन जातो!”

स्पंदनच्या या छोट्याशा पण अत्यंत मोलाच्या योगदानाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्याच्या या कृतीने मोठ्यांसमोरही एक आदर्श ठेवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *