लॉजच्या नावाखाली देहव्यापाराचा काळा बाजार; पोलिसांचा ‘अर्थपूर्ण’ काणाडोळा?..परराज्य आणि ग्रामीण भागांतून तरुणींना जाळ्यात ओढून या दलदलीत ढकलले जातात.
नाशिकरोड परिसरात लॉजच्या नावाखाली कुंटणखाने थाटून सुरू असलेला देहव्यापाराचा गोरखधंदा आता चव्हाट्यावर आला आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसरात्र सुरू असलेल्या या काळ्या साम्राज्यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले असून, खाकीच्या भूमिकेवर गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.
नाशिकरोडमधील धक्कादायक वास्तव
लॉजच्या नावाखाली आखाडे.. रेल्वे स्टेशन परिसर, बस स्टँड बिटको चौक आणि मुख्य महामार्गालगतच्या लॉजमध्ये खुलेआम देहव्यापार चालवला जात असल्याचा नागरिकांचा आरोप..
परराज्यातून आणि ग्रामीण भागांतून तरुणींना जाळ्यात ओढून या दलदलीत ढकलले जात असल्याची माहिती.
नागरिकांचा रोष: भरवस्तीत सुरू असलेल्या या गैरप्रकारांमुळे महिला आणि कुटुंबांचे रस्त्यावरून चालणे कठीण.
नागरिकांचे प्रश्न खाकी गप्प का?
परवानगी कोणाची? नाशिकरोड पोलिसांच्या नाकाखाली हा गोरखधंदा सुरू ठेवण्याची हिंमत लॉज चालकांमध्ये येते कुठून?
आशीर्वाद कोणाचा? हा काळा बाजार चालवण्यासाठी स्थानिक राजकीय वरदहस्त की खाकीची ‘अर्थपूर्ण’ साथ?
कारवाईचे केवळ नाटक? तक्रारी वाढल्यावर थातुरमातुर धाडी टाकून बड्या माशांना सोडून देण्याचे काम कोण करतंय?
लॉज मालकांवर गुन्हे का नाहीत?
फक्त दलालांवर जुजबी कारवाई करून मूळ मालक आणि लॉजचे परवाने का रद्द केले जात नाहीत?
प्रशासनाला जनतेचा थेट इशारा
नाशिकरोड पोलिसांनी तातडीने अशा संशयित लॉजची तपासणी करून पीटा (PITA) कायद्यान्वये कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. आता नाशिक पोलीस आयुक्त या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नाशिकरोडला लागलेला हा काळा डाग पुसून काढणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.






