ताज्या बातम्या दुःखत वार्ता

उपनगर नाका सिग्नलवर कंटेनर ट्रकची ज्युपिटरला धडक…. निवृत्त लष्करी कर्मचारी ठार….६४ वर्षीय संजय मालोजीराव घार्गे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू….. कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल…..

उपनगर नाका सिग्नलवर कंटेनर ट्रकची ज्युपिटरला धडक…. निवृत्त लष्करी कर्मचारी ठार….६४ वर्षीय संजय मालोजीराव घार्गे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू….. कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल…..

उपनगर नाका सिग्नलवर कंटेनर ट्रकने ज्युपिटर मोपेडला धडक दिल्याने ६४ वर्षीय निवृत्त लष्करी कर्मचारी संजय मालोजीराव घार्गे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी ६ ऑक्टोबर सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला.

लष्करी सेवेतून निवृत्त संजय घार्गे हे शिखरेवाडी परिसरात राहत होते. त्यांची मुलगी डॉ. अंकिता घार्गे यांच्या उपनगर परिसरातील शुश्रूषा हॉस्पिटलच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने त्याची देखरेख घार्गे करीत होते.

नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ते घरातून हॉस्पिटलच्या दिशेने ज्युपिटरवरून निघाले होते.
नाशिक-पुणे महामार्गाने उपनगर नाका सिग्नलवरून जात असताना नाशिकरोडकडून द्वारकेच्या दिशेने जाणाऱ्या अशोक लेलँड कंटेनर
क्रमांक MH 04 LE 5821
ट्रकने त्यांच्या ज्युपिटर मोपेडला जोरदार धडक दिली. या धडकेत घार्गे रस्त्यावर पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. पोलिसांनी रुग्णवाहिकेतून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या प्रकरणी डॉ. अंकिता घार्गे यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांनी कंटेनर चालक प्रदीप विठ्ठल चव्हाण (वय २८, रा. जालना) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *