ताज्या बातम्या धार्मिक

कंगणी बांधून ४० दिवसांच्या कठोर चालीहा व्रताचा संकल्प… झूलेलाल चालीहा महोत्सवाला प्रारंभ….

कंगणी बांधून ४० दिवसांच्या कठोर चालीहा व्रताचा संकल्प… झूलेलाल चालीहा महोत्सवाला प्रारंभ….


सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झूलेलाल यांच्या अवतरण स्मरणार्थ श्री झुलेलाल चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने सोमवार 3 ऑगस्ट ते शनिवार 12 सप्टेंबर या कालावधीत झूलेलाल चालीहा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने समाजातील भाविक ४० दिवसांचे कठोर चालीहा व्रत पाळणार आहेत. 3 ऑगस्ट रोजी नाशिकरोड कलानगर येथील पूज्य झूलेलालअंदिरात अखंड ज्योतीसमोर महाराज प्रदीप शर्मा आणि महाराज बाबुलाल शर्मा यांच्या हस्ते व्रतधारकांना कंगणी बांधून ४० दिवसांच्या कठोर व्रताचा संकल्प देण्यात आला. या काळात व्रतधारकांनी दिवसातून एकदाच सात्विक भोजन करणे, जमिनीवर झोपणे, केस व दाढी न कापणे, सौंदर्यप्रसाधनांचा वापर टाळणे, तामसी आहार व वस्तूंपासून दूर राहणे तसेच काम, क्रोध यांसारख्या विकारांवर संयम ठेवून भगवान झूलेलाल यांची भक्तिभावाने उपासना करणे अपेक्षित असते. यानिमित्ताने पूज्य झुलेलाल सिंधी सेवा मंडळातर्फे
शुक्रवार 7 ऑगस्ट रोजी लक्ष्मी वलभ – उल्हासनगर,
शुक्रवार ऑगस्ट रोजी जय माता दी ग्रुप चालीस गाव
शुक्रवार – 21 ऑगस्ट रोजी ममता तोलानी ग्रुप नासिक, शुक्रवार – 28 ऑगस्ट रोजी-जय झुलेलाल भजन मंडली, देवालाली, शुक्रवार 4 सप्टेंबर रोजी जय ज्योतिनवारा म्युझिकल ग्रुप नाशिक रोड, शुक्रवार – 11 सप्टेंबर रोजी श्री शारदा शरणम् सतसंग आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. चालीहा साहिब महाउत्सव दरम्यान दर शुक्रवारी
बहिराणा साहिब पूजा होणार आहे.
४० दिवस चालणाऱ्या या धार्मिक अनुष्ठानाचा भक्तिमय वातावरणात होणार आहे. सर्व कार्यक्रमांचे भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पूज्य झुलेलाल सिंधी सेवा मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *