नाशिकरोडमध्ये गुरुनानक देवजींच्या प्रकाशपर्वानिमित्त १६ ते २३ नोव्हेंबरदरम्यान भव्य प्रभातफेरीचे आयोजन..साध संगतच्या वतीने आठ दिवस विविध परिसरांतून निघणार प्रभातफेरी…..
शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक देवजी यांच्या प्रकाशपर्वानिमित्त नाशिकरोड येथील साध संगतच्या वतीने सोमवार, दि. १६ नोव्हेंबर ते सोमवार २३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आठ दिवसीय भव्य प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

‘सदगुरु नानक प्रगटिया, मिटी धुंध जग चानण होया’ या पवित्र संदेशाने संपूर्ण परिसर भक्तिमय करण्याच्या उद्देशाने या प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी ५.१५ वाजता गुरुद्वारा साहिब, नाशिकरोड येथून प्रभातफेरीला प्रारंभ होणार असून सोमवार 16 नोव्हेंबर रोजी बिटको-मुक्तीधाम-हरि निवास-गुरूद्वारा साहेब,
मंगलवार 17 नोव्हेंबर रोजी म्हसोबा मंदिर – मनोहर गार्डन – गुरूद्वारा साहेब, बुधवार 18 नोव्हेंबर रोजी भारत एन्क्लेव (इंदिरा नगर) – उपनगर – गुरुद्वारा साहेब,
गुरुवार 19 नोव्हेंबर रोजी हरी नक्षत्र – सिंधी कॉलनी – गुरुद्वारा साहेब,
शुक्रवार 20 नोव्हेंबर रोजी तरण तलाव – आनंद नगर – गुरूद्वारा साहेब,
शनिवार 21 नोव्हेंबर रोजी सुयोजित-गंधर्व नगरी-शिखरेवाडी-गुरूद्वारा साहेब,
रविवार 22 नोव्हेंबर रोजी जयभवानी रोड – गुरूद्वारा साहेब,
सोमवार 23 नोव्हेंबर रोजी पंजाब कॉलनी – जगताप मला ते गुरुद्वारा साहेब असे प्रभातफेरी चे नियोजन करण्यात आले असून भाविकांनी उपस्थित राहून सेवा आणि दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.






