Homeक्राईमजबरी लूट करणारे आंतर जिल्ह्यातील गुन्हेगार अटकेत तसेच अबोला येथे पिस्तूल, ४...
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

जबरी लूट करणारे आंतर जिल्ह्यातील गुन्हेगार अटकेत तसेच अबोला येथे पिस्तूल, ४ मोटार सायकल जप्त ….. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…..

येवला शहरात जबरी लुटमार करणारा आंतरजिल्हयातील सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून देशी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे जप्त केले आहे. १३ जानेवारी रोजी अज्ञात आरोपीतांनी येवला शहरातील साई पैठणी दुकानात जावुन फिर्यादी शब्बीर शेख व साक्षीदार यांना चाकु व तलवारीचा धाक दाखवुन रोख रक्कम व ०२ मोबाईल फोन असा एकुण १९,०००/-रू. किं.चा मुद्देमाल जबरी चोरी करून चोरून नेल्या बाबत येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त बातमीच्या आधारे अहिल्यानगर जिल्हयातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार संशयित फरान एजाज सैय्यद, वय २२, रा. सुभाषनगर, कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर यास कोपरगाव नाका परिसरातुन ताब्यात घेतले असून त्याचे ताब्यातील गुन्हयात चोरीस गेलेले व्हिवो व्ही-२९ व रेडमी नोट-१० असे दोन मोबाईल फोन किं. रू. १३,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयिताने त्याचे साथीदार आसिफ शेख, रा. संजयनगर, कोपरगाव, जैदखान अमजखान पठाण, रा. संयजनगर, कोपरगाव यांच्यासोबत जानेवारी महिन्यात येवल्यातील एका पैठणीचे दुकानात चाकु व तलवारीचा धाक दाखवुन रोख रक्कम व मोबाईल फोन जबरीने चोरी केल्याची कबुली दिली आहे. यातील फराज सैय्यद हा शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात फरार होता.

नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास ताब्यात घेवुन येवला शहर पोलीस ठाणेकडील वरील गुन्हयात अटक केली आहे. सदर आरोपींचे इतर साथीदारांचा पोलीस पथक कसोशिने शोध घेत असून त्यांचेकडून जबरी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.कळवण तालुक्यातील अभोणा शिवारात देशी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे जप्त चोरीच्या ०४ मोटर सायकल हस्तगत…. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…..

कळवण तालुक्यातील अभोणा शिवारात देशी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत काडतुसे जप्त चोरीच्या ०४ मोटर सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. अभोणा पोलिस ठाणे हद्दीत पिंपळे गावात काही संशयीत चोरीच्या मोटर सायकल घेवुन येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती. पथकातील सदर ठिकाणावर छापा टाकला असता संशयित हिराचंद उर्फ महाराज शिवाजी बर्डे, रा. पिंपळे खु॥, ता. कळवण हा पोलीसांची चाहुल लागताच फरार झाला. सदर ठिकाणावर झडती घेतली असता संशयिताकडून ०१ देशी बनावटीचे पिस्टल, ०२ जिवंत काडतुसे, ०१ एअरगन तसेच चोरीच्या ०४ मोटर सायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत. विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र बाळगतांना मिळुन आल्याने त्याचेविरूध्द अभोणा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या ताब्यातून असलेली मोटर सायकल बाबत खात्री केली असता, यातील ०४ मोटर सायकल हया कळवण, अभोणा, वणी परिसरातुन चोरी केलेल्या असल्याचे उघडकीस आली आहे.

सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, पोउनि हर्षल भोळे, सहायक पोलीस उप निरीक्षक शिवाजी ठोंबरे, पोलीस अंमलदार प्रविण काकड, रावसाहेब कांबळे, योगिता काकड, किशोर खराटे, गोरक्षनाथ संवत्सरकर, प्रशांत पाटील, सुधाकर बागुल, सतीष घुटे, विशाल आव्हाड, केतन कापसे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, छाया गायकवाड, अस्मिता मढवई आदींनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments