Homeक्राईमनाशिकला गुंडांचे राज्य.......? नाशिक मध्ये खुनाचे सत्र सुरूच शहरातील अंबड परिसरात...

नाशिकला गुंडांचे राज्य…….? नाशिक मध्ये खुनाचे सत्र सुरूच शहरातील अंबड परिसरात पुन्हा एकदा खून…….

नाशिकला गुंडांचे राज्य…….?
नाशिक मध्ये खुनाचे सत्र सुरूच
शहरातील अंबड परिसरात पुन्हा एकदा खून…….

नाशिकच्या अंबड येथे पुन्हा एकदा खून झाल्याने भीतीचे वातावरण पसरले असून गुंडांचे राज्य आहे का ? असा सवाल नागरिक करीत आहेत. अंबड येथील शिवाजी चौक शॉपिंग सेंटर येथील संदीप आठवले या २३ वर्षीय भाजी विक्रेत्ता युवकाचा खून करण्यात आला आहे. संदीप वर सहा अज्ञात व्यक्तींनीच धारदार शस्त्राने छातीत, पोटात व मानेवर तब्बल २५ पेक्षा जास्त वार करून ठार मारल्याची घटना घडल्याने पोलिसांविरुद्ध नागरिकांमध्ये नाराजी असून संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारी वाढली असल्यामुळेच खुनाच्या घटना होत आहेत. मागील खूनांचे आरोपी त्वरित पकडल्याने नाशिक पोलिसांबद्दल नागरिक समाधान व्यक्त करीत होते पण पुन्हा आणि वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे पोलिसांचे धाक राहिले नाही का? असा सवाल ही नागरिक करीत आहेत. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग तिसऱ्या गुरुवारी हे हत्येचं सत्र घडल्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खुनाची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस घटनास्थळी दाखल झाली असून सी सी टीव्ही आणि इतर माहिती पोलिस घेत असून लवकरच या खुनाचा उलघडा होऊन गुन्हेगारांना पकडण्यात येईल अशी आशा नागरिकांना नाशिक पोलिसांवर आहे.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments