ताज्या बातम्या राजकारण

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने संत ‘नरहरी सोनार महाराज’ यांना अभिवादन

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने संत ‘नरहरी सोनार महाराज’ यांना अभिवादन

महाराष्ट्र भूमीत जन्मलेले संत परंपरेतील सोनार समाजाचे व महाराष्ट्राचे दैवत ‘संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज’ यांची पुण्यतिथि निमित्त 27 फेब्रुवारी रोजी नाशिकरोड जेलरोड परिसरात ठिकठिकाणी महाराजांना अभिवादन करून संपन्न झाली.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने देखील जेलरोड येथे संत शिरोमणी ‘नरहरी सोनार महाराज’ यांच्या प्रतिमेस पुण्यतिथी दिनी पुष्पहार अर्पण करून महाराजांच्या नावाचा जयजय कार करण्यात आला. यावेळी पीआरपी नाशिक जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे, सोनार समाजाचे नेते योगेश नागरे, संतोष पोदार, किशोर हुजबंद, निलेश शहाणे, संदीप नवसे, ज्येष्ठ साहित्यिक साराभाई वेळुंजकर, भागवत डोळस, मनोज लोळगे, महेश लोळगे, राज निकाळे, गणेश लोळगे, भारत माळवे, संतोष माळवे, सागर कुलथे, प्रवीण कुलथे, नवनाथ कातकडे, जावेद शेख, सलमान खान, शादाब शेख, आबिद शेख,रफिक टकारी,मुरली घोरपडे,गयाबाई काळे, विमल सोनवणे,मालन संमदुर, रोशनी बनसी, तुळजा मोरे आदी महिला व पुरुष उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *