आयुक्तालयातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…..
नाशिक पोलिस आयुक्त यांनी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार आयुक्तालयातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
अंबड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांची बदली गंगापुर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग नवलसिंग राजपुत्र यांच्या जागी करण्यात आली आहे तर जगवेंद्र सिंग राजपूत यांची बदली अंबड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. अंबड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोहर रामा कारंडे यांची बदली इंदिरा नगर पोलिस ठाणे पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या जागी, भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश आत्माराम अहिरे यांची सातपूर पोलीस ठाणे पोलिस निरीक्षक रणजीत पंडित नलवडे यांच्या जागी, सायबर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश नानाजी पाटील यांची आडगाव पोलीस ठाणे पोलिस निरीक्षक संजय मारुती पिसे यांच्या जागी, मुंबई नाका पोलिस ठाणे पोलिस निरीक्षक संतोष बबनराव नरूटे यांची एम आय डी सी पोलिस ठाणे पोलिस चौकी पोलीस निरीक्षक विश्वास रोहिदास पाटील यांच्या जागी, आडगाव पोलीस ठाण्याचे संजय मारुती पिसे यांची सायबर पोलिस ठाणे पोलिस निरीक्षक उमेश नानाजी पाटील यांच्या जागी, एम आय डी सी पोलिस चौकी पोलीस निरीक्षक विश्वास रोहिदास पाटील यांची मुंबई नाका पोलिस ठाणे पोलिस निरीक्षक संतोष बबनराव नरूटे यांच्या जागी, इंदिरा नगर पोलिस ठाणे पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांची शहर वाहतूक शाखा युनिट 1 पोलिस निरीक्षक तुषार मुरलीधर आढावू यांच्या जागी, शहर वाहतूक शाखा युनिट 1 पोलिस निरीक्षक तुषार मुरलीधर आढावू यांची सातपूर युनिट शहर वाहतूक शाखा पोलिस निरीक्षक रियाज एनुड्डिन शेख यांच्या जागी, सातपूर युनिट शहर वाहतूक शाखा पोलिस निरीक्षक रियाज एनुड्डिन शेख यांची द्वारका युनिट शहर वाहतूक शाखा याठिकाणी अशा अंतर्गत बदल्या करून नव्या जागी प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आल्या आहेत.