Featured Uncategorized अपघात

भावली धरणात नाशिकरोडच्या ५ जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू……

भावली धरणात नाशिकरोडच्या ५ जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू……

भावली धरणात फिरायला गेलेले नाशिकरोडच्या ५ जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी ८ जण रिक्षाने भावली धरणावर फिरण्यासाठी गेले होते दुर्दैवाने ३ युवती आणि २ युवकांचा बुडून मृत्यू झाला. पाच जण बुडून मरण झाल्याची माहिती पसरताच गोसावी वाडीत दुःखाचे वातावरण पसरले. स्थानिक आदिवासी नागरिकांच्या मदतीने ५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून उत्तरीय तपासणी करण्यासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

मृतांमध्ये अनस दिलावर खान, वय १५, नाझिया इमरान खान, वय १५, मीजबाह दिलावर खान, वय १६, हनीफ अहमद शेख, वय २४, ईकरा दिलावर खान, वय १४ यांचा समावेश आहे. भावली धरणावर संबंधित विभागाकडून मार्गदर्शक नियमावली आणि सावधानी घेण्याबाबतचे फलक लावावेत अशी स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे.पाच जणांचा दुर्दैवी मृत्यूने नाशिकरोड परिसरात या घटनेने शोककळा पसरली आहे.इगतपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन कार्यवाही सुरु केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *