क्राईम

मोटार सायकल चोरणारे ०२ आरोपी ताब्यात….. १७ मोटार सायकल हस्तगत….. गुन्हेशाखा युनिट क २ ची कामगिरी

मोटार सायकल चोरणारे ०२ आरोपी ताब्यात….. १७ मोटार सायकल हस्तगत….. गुन्हेशाखा युनिट क २ ची कामगिरी…..

शहरात सुरू असलेल्या मोटार सायकल चोरांविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असून गुन्हे शकाहा युनिट २ ने १७ मोटार सायकल जप्त करून दोन संशयितांना अटक केली आहे. युनिट २ चे गुलाब सोनार यांना मिळालेल्या गोपनिय बातमी आधारे पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांचे मार्गदर्शनाखाली विशाल मधुकर धांडे वय ३८ वर्ष, रा. केवलपार्क, महादेव मंदीराजवळ, अंबड, नाशिक, माहेन शालीग्राम ढाके वय ३७ वर्ष, रा. स्वामीनगर, ओमकारेश्वर महादेव मंदीराजवळ, अंबड, नाशिक या दोन संशयितांना पोलिस उप निरीक्षक संदेश पाडवी व त्यांचे सोबतचे पथकाने अंबड पोलीस भादविक ३७९ प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरलेली बुलेट मोटार सायकल विकी करण्याकरीता आले असताना ताब्यात घेतले.

दोघांनी नाशिक शहर परिसरातुन बुलेट, अॅव्हेंजर, शाईन, पल्सर, मोपेड मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली, एकुण १३,३५,०००/-रू चोरलेल्या १७ मोटार सायकल त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त प्रशात बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त सिताराम कोल्हे यांच्या मार्गदशनाखाली गुन्हे शाखा युनिट -२ चे पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक संदेश पाडवी, सहायक पोलिस उप निरीक्षक यशंवत बेडकोळी, बाळु शेळके, गुलाब सोनार, प्रशांत वालझाडे, शंकळ काळे, चंद्रकात गवळी, विजय वरंदळ, सुनिल आहेर, नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश भालेराव, संजय सानप, प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, राजेंद्र घुमरे, मधुकर साबळे, अतुल पाटील, नितिन फुलमाळी, प्रविण वानखेडे यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *