Homeक्राईमइगतपुरीत सोयाबीनच्या गोण्यांमध्ये अवैध गुटख्यासह ४६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत......नाशिक ग्रामीण पोलीसांची कारवाई
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

इगतपुरीत सोयाबीनच्या गोण्यांमध्ये अवैध गुटख्यासह ४६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत……नाशिक ग्रामीण पोलीसांची कारवाई

इगतपुरीत सोयाबीनच्या गोण्यांमध्ये अवैध गुटख्यासह ४६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत……नाशिक ग्रामीण पोलीसांची कारवाई…….

मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानीकारक असणा-या खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणुक, वाहतुक आदी व्यावसायांना प्रतिबंधीत करण्यात आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीसांनी जिल्हाअंतर्गत गुटख्याची वाहतूक, विक्री, वितरण व साठवणूक करणा-यांविरूध्द कारवाई सुरू आहे.१४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीचे सुमारास मुंबई आग्रा महामार्गाने मालेगाव मार्गे मुंबई बाजूकडे काही संशयीत इसम मालवाहू कंटेनर मध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतुक करून विक्री करण्याचे उद्देशाने जाणार असल्याची गोपनीय माहिती मालेगाव शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तेघबीर संधु यांना मिळाली होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांचे पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर टाके घोटी, इगतपुरी शिवारात छापा टाकून, आयशर कंपनीचा कंटनेर कमांक डी.डी.-०१-एफ-९१०२ यामध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारे अमृत भगवान सिंह, वय ४२, रा. वडवेली, पो. हिनौतीया, ता. खिलचीपुर, जि. राजगड, मध्यप्रदेश, पुनमचंद होबा चौहान, वय ५१, रा. सकारगाव, ता. बिकनगाव, जि. खरगोन, मध्यप्रदेश यांना ताब्यात घेतले. सदर इसम हे कंटनेरमध्ये सोयाबीनच्या गोण्यांच्यामागे लपवून, चोरटया रितीने गुटख्याची वाहतुक करतांना मिळून आले आहे. त्यांचे कब्जातून एस.एच. के. सुगंधीत गुटख्याचा २१,०२,४००/- रूपये किंमतीचा अवैध गुटखा व कंटनेर कमांक डी.डी.-०१-एफ-९१०२ असा एकुण ४६,२३,४००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेले संशयित हे महाराष्ट्र राज्यात उत्पादन, साठा व साठयास प्रतिबंधीत असलेला गुटखा, सुगंधीत /स्वादीष्ट तंबाखू, पानमसाला, सुगंधीत स्वादीष्ट सुपारी व तत्सम गुंगीकारक पदार्थ मानवी शरीरास सेवन करण्यास अपायकारक असल्याने तसेच अवैधरित्या गुटखा विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगातांना संशयितांविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात भादवि कलम ३२८,२७२,२७३,१८८,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली

असून पुढील तपास इगतपुरी पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार करीत आहे. सदरची कारवाई
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव शहर विभाग तेघबीर संधु यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, पोलिस उप निरीक्षक दत्ता कांभिरे, मनोज सानप यांनी सदरची कारवाई केली आहे. गुटखा विरोधी कारवाई आणखी तीव्र करण्यासाठी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या असून पोलीसांकडून व्यापक स्वरूपात कारवाई करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments