क्राईम ताज्या बातम्या

१ लाख ८० हजार रुपयांचा अवैध गुटखा जप्त…. गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई……

१ लाख ८० हजार रुपयांचा अवैध गुटखा जप्त…. गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई……

विक्रीसाठी अवैधपणे गुटखा रिक्षामध्ये घेवुन जाणाऱ्या एकास १,८२,७००/-रूपये किंमतीच्या मुद्देमालासह ताब्यात गुन्हेशाखा युनिट क. १ ने ताब्यात घेतले आहे. ११ जून रोजी गुन्हे शाखा, युनिट १ चे विलास चारोरकर व नितीन जगताप यांना गोपनीय माहीती मिळाली की, रिक्षा क्रमांक एम.एच. १५-ई.एच-२०८६ यामध्ये प्रतिबंधीत असलेला पानमसाला व सुगंधीत तंबाखू (गुटखा) अवैद्य विक्री करण्यासाठी गंगापुररोडने सातपुरकडे जाणार असल्याची माहिती मिळाली. हिराबाग, गंगापुर रोड, नाशिक येथे पथक सापळा लावुन थांबले असतांना रिक्षा क्रमांक एम एच १५ ई.एच.२०८६ मध्ये प्रतिबंधीत असलेला पानमसाला व सुगंधीत तंबाखू (गुटखा) अवैद्य विक्री करण्याकरीता घेवुन जातांना मिळुन आल्याने संशयित वैभव शंकर खरास, वय ४३वर्षे, रा. घर नं. १२, मारूती मंदिरासमोर, म्हसरूळ गाव, यास ताब्यात घेतले. रिक्षा मध्ये बेकायदेशीरपणे विक्री करीता नेत असलेला एकुण किंमत रुपये १,८२,७००/- रु. किंमतीचा प्रतिबंधीत असलेला अन्नपदार्थ व सुगंधी गुटखा जप्त करण्यात आला आहे.


सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहायकपोलीस आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलिस निरीक्षक हिरामण भोये, पोलीस उप निरीक्षक सुदाम सांगळे, रमेश कोळी, उत्तम पवार, रोहिदास लिलके, नाझीमखान पठाण, महेश साळुंके, विलास चारोस्कर, नितीन जगताप, राहुल पालखेडे, नगेश्वर बोरसे, अनुना येलवे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *