क्राईम ताज्या बातम्या

रेकॉर्डवरील हद्दपार आरोपी ताब्यात…… विशेष पथकाची उत्कृष्ठ कामगिरी

रेकॉर्डवरील हद्दपार आरोपी ताब्यात…… विशेष पथकाची उत्कृष्ठ कामगिरी……

म्हसरूळ पोलीस ठाण्यातील हद्दपार रितेश भाऊराहेब चव्हान हा चाणक्यपुरी सोसा. म्हसरूळ लिंक रोड, राऊ हॉटेलचे मागे, नाशिक येथे येणार असल्याची खात्रीशिर बातमी दत्तात्रेय चकोर व गणेश वडजे यांना मिळाली. त्या अनुषंगाने विशेष पथकातील अंमलदार यांनी सापळा लावुन हद्दपार आरोपी रितेश भाऊसाहेब चव्हाण, वय २३ वर्षे, व्यवसाय- सुखवस्तु, रा. वज्रमुद्रा अपा. रूम नं१०, सप्तरंग सोसायटी मागे, पेठरोड, नाशिक यास चाणक्यपुरी सोसा. म्हसरूळ लिंक रोड, नाशिक येथुन शिताफीने ताब्यात घेवुन त्यास पुढील तपासासाठी म्हसरूळ पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज भालेराव, किशोर रोकडे, भारत डंबाळे, दत्तात्रेय चकोर, भुषण सोनवणे, चारुदत्त निकम, स्वप्नील जुंद्रे, गणेश वडजे भगवान जाधव, चंद्रकांत बागडे यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *