क्राईम ताज्या बातम्या

भद्रकाली कुंभरवड्यात मध्यरात्री गाड्यांची जाळपोळ…… टवाळखोरांवर कारवाईची मागणी……

भद्रकाली कुंभरवड्यात मध्यरात्री गाड्यांची जाळपोळ…… टवाळखोरांवर कारवाईची मागणी……

भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जुने नाशिक कुंभारवाडा येथे मध्यरात्री दोन अडीच वाजेच्या सुमारास 6 ते 7 गाड्यांची जाळपोळ करून दहशत माजवण्याचं प्रयत्न करण्यात आले. जाळपोळीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये कुंभारवाडा मध्ये आशा प्रकारे तिसऱ्यांदा हा प्रकार घडला असून याआधी दोन मोटरसायकल जाळण्यात आले होते.

काल मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी कुंभारवाडा भागामध्ये गाड्यांची जाळपोळ केली आहे यामध्ये दोन एक्टिवा एक छोटी लुना दोन मोटरसायकली एक छोटा हत्ती व एक ढकलगाडी जाळण्यात आली आहे. परिसरातील भागांमध्ये दहशतीचा वातावरण निर्माण झाला असून सातत्याने असे प्रकार घडत असल्याने या भागातील नागरिक भयभीत झाले आहेत .

या भागातील नागरिकांनी सीसीटीव्ही लावण्याची वारंवार मागणी करूनही या भागात सीसीटीव्ही लावण्याकडे मनपा, पोलिस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही. परिसरात पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवावी तसेच टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *