भाजपा व्यापारी आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी किशन अडवाणी यांची नियुक्ती…..
सिंधी समाजाचे ज्येष्ठ नेते किशन अडवाणी यांची नुकतीच भाजपा प्रदेश व्यापारी आघाडी उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधी समाजात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे कार्यसम्राट किशन अडवाणी हे गेल्या चौदा वर्षापासून नाशिक सिंधी पंचायतीचे उपाध्यक्ष पदी राहून त्यांनी समाजाची सेवा केली. किशन अडवाणी सिंधी सागर अकॅडमी आणि नाशिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशन चे सदस्य आहेत तसेच अडवाणी हे नाशिक महा नगरपालिकेचे प्रभाग समिती सदस्य पदी होते.
सामाजिक क्षेत्रात आदराचे स्थान असलेले किशन अडवाणी यांची भाजप व्यापारी आघाडी महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने सिंधी समाजात आनंदाची लाट पसरली आहे. राज्यातील वरिष्ठांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासावर मी खरा राहीन आणि भाजप पक्षाने दिलेले कार्य कार्यकर्ता म्हणून पूर्ण करेन तसेच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि व्यापारी आघाडीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी दिलेली कामे पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन असे किशन अडवाणी यांनी आपल्या नियुक्तीबाबत बोलतांना सांगितले.