५०० किलो गोमांस जप्त…. नाशिकरोड गुन्हे शोध पथकाची कामगिरी……
नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत, गोमांस वाहतूक करताना एका आरोपीस इको वाहनासह ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १ लाख रुपये किमतीचे ५०० किलो गोमांस व एक इको गाडी किंमत ३ लाख ५० हजार रुपये असा एकूण ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नाशिक रोड पोलीस स्टेशन च्या गुन्हे शोध पथकाने जप्त केले आहे. ११ फेब्रुवारी रोजी नाशिक रोड पोलीस ठाण्यातील संदीप पवार यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत नाशिक पुणे महामार्गावरून गोमांसाची वाहतूक होणार आहे.
पोलिस उप आयुक्त मोनिका राऊत मॅडम, सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी, तसेच वरीष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गणेश शेळके, विजय टेमगर, विष्णू गोसावी, आणि गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा रचून चालकास ताब्यात घेऊन नमूद गोवंश मांस व एक इको वाहन ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाणे येथे भारतीय दंड कलम 429 सह प्राणी संरक्षक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. अधिक तपास नाशिकरोड पोलिस ठाण्याचेवरीष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.