Homeक्राईममंदिरातून कृष्णा मूर्तीचा चांदीचा मुकुट चोरी करणारा चोर जेरबंद........ पंचवटी पोलिस ठाणे...

मंदिरातून कृष्णा मूर्तीचा चांदीचा मुकुट चोरी करणारा चोर जेरबंद…….. पंचवटी पोलिस ठाणे गुन्हेशोध पथकाची कामगिरी

मंदिरातून कृष्णा मूर्तीचा चांदीचा मुकुट चोरी करणारा चोर जेरबंद…….. पंचवटी पोलिस ठाणे गुन्हेशोध पथकाची कामगिरी…..

२१ सप्टेंबर रोजी चोरट्याने रात्री ०९:३० वाजेच्या सुमारास पंचमुखी हनुमान मंदिरातील कृष्ण मुर्तीचा मुकुट चोरी करून पलायन केले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. संवेदनशील गुन्हा असल्याने पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फुटेजमधील चांदीचा मुकूट चोरी करणाऱ्या संशयीत इसमाचा शोध सुरू केला. गुन्हे शोध पथकाचे वैभव परदेशी यांना माहिती मिळाली की, पंचमुखी हनुमान मंदिरातील कृष्ण मुर्तीचा मुकुट चोरी करणारा गणेशवाडी, पंचवटी, नाशिक याठिकाणी आलेला आहे. तात्काळ पंचवटी पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी गणेशवाडी येथे जाऊन सापळा रचून इसम किरण हेमंत गांगुर्डे वय २९ वर्ष रा. कोळीवाडी, गणेशवाडी, पंचवटी, नाशिक यास ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता, त्याच्या ताब्यात १५० ग्राम वजनाचा १५ हजार रुपये किमतीचा एक चांदीचा मुकुट मिळुन आला. सदर गुन्हयात किरण गांगुर्डे याला अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास मालसाने करीत आहेत.


सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे सो, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक सपकाळे , पोलिस निरीक्षक बगाडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित केदार, सहायक पोलिस निरीक्षक मिथुन परदेशी, सागर कुलकर्णी, दिपक नाईक, कैलास शिंदे, निलेश भोईर, संदिप मालसाने, संतोष पवार, वैभव परदेशी, विष्णू जाधव, महाले आदींनी संयुक्तिकरित्या कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments