बांधकाम साईट महीलेचा खुन, आवघ्या चार तासात आरोपी ताब्यात….. विधी संघर्षीत बालक ताब्यात….. मोबाईल तोडल्याच्या राग आल्याने खून……
१९ फेब्रुवारी रोजी नाशिक पुणा रोड गुरुद्वारा समोर एका अर्धवट असलेल्या बांधकाम साईट वर सोनाली भानुदास काळे या विवाहित महिलेचा मृतदेह पाण्यामध्ये वायरने बांधलेले एका गोणित मिळून आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हयात दिलेल्या फिर्यादी नुसार मिसींग महिला हिचे पती, सासु, सासरे, दिर, दिरानी यांचेवर संशय व्यक्त करण्यात आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. १७ फेब्रुवारी रोजी मयत महिला बाबत मीसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनास्थळाची परिस्थीती पाहुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व पोलिस निरीक्षक बाबासाहेब दुकले यांनी दोन पथके तयार केले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस विभाग आरोपीचा शोध घेत होते. पोलिस निरीक्षक बाबासाहेब दुकळे, गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सचिन चौधरी, विनोद लखन, सुरज गवळी यांनी घटनास्थळाची व तिथे समोर राहणा-या घरांची बारकाईने पाहणी करता त्यांना विधी संघर्षीत बालकाच्या राहत्या घराच्या लगत असलेल्या पत्राच्या खोलीत सिमेंटच्या कोब्यावर रक्ताचे सुकलेले थारोळे व शिंतोडे दिसुन आल्याने त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने सांगितले की, मिसींग महिला ही १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ०४:०० वाजेच्या सुमारास त्याच्याकडे तिचे पतीला फोन करण्यासाठी मोबाईल मागण्यासाठी आली होती.
पंरतु विधीसंघर्षीत बालक व ती महिला यांच्यात त्यावरून वाद झाल्याने महिलेने बालकाचा मोबाईल हिसकावुन जमिनीवर आदळला. त्यामुळे बालकाला त्याचा राग आल्याने त्याने घरात असलेल्या हातोडीने महीलेच्या डोक्यात व चेह-यावर दोन तिन वार करून जखमी करून त्याच्या घराच्या बाजुलाच असलेल्या खोलीत तिला बंद केले. सदर महिलेची सासु व भाऊजाई परिसरातुन बाहेर गेल्याचे पाहून व आजुबाजूला कोणीही नसल्याचे खात्री करून त्याने पुरावा नष्ट करण्याच्या दुष्टीने महीलेचे प्रेत प्लास्टीकच्या बारदानामध्ये गुंडाळून समोर असलेल्या हरी नक्षत्र बिल्डींगचे बांधकाम चालु असलेल्या पाण्याच्या खडया मध्ये फेकुन दिले. तपासादरम्यान वरील प्रकार समोर आल्यानंतर विधी संघर्षीत बालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त मोनिका राउत साो, सहा. पोलीस आयुक्त सचिन बारी साो, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाबासाहेब दुकळे, सहायक पोलिस निरीक्षक चौधरी, पोलिस उप निरीक्षक सुरश गवळी व विनोद लखन, इमाण शेख, पंकज कर्पे, गौरव गवळी, अनिल शिंदे, जयंत शिंदे, राहुल जगताप, सुरज गवळी, सौरभ लोंढे, संदेश रघतवान, मुकेश शिरसागर, मिलिंद बागुल, सतिश मढवई यांनी केली असुन गुन्हयाचा तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब दुकळे हे करीत आहेत.