अपघात ताज्या बातम्या

भीषण अपघातात शिक्षकाचा मृत्यू….. एक गंभीर जखमी…..

भीषण अपघातात शिक्षकाचा मृत्यू….. एक गंभीर जखमी…..

देवळाली कॅम्प कडून नाशिकरोड कडे येणाऱ्या व जाणाऱ्या दोन दुचाकी मध्ये भीषण अपघात झाला असून त्यात एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे तर एक तरुणांची प्रकृती चिंताजनक आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की रविवारी रात्री दहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास देवळाली कॅम्प येथून शॉन मार्क बेलसेर वय २६ राहणार बांस स्कुल हा आपल्या के टी एम या दुचाकी वरून नाशिकरोड कडे येत होता, त्याचवेळी ओमकार बंडू गायकवाड वय २४ राहणार मारुती मंदिरा समोर, गायकवाड गल्ली, भगूर हा आपल्या पल्सर दुचाकीने नाशिकरोड कडून भगूरकडे आपल्या घरी जात असताना हॉटेल निक्की सागर समोर समोरासमोर धडक झाली. या धडकेत बॅन्स स्कुल येथील शिक्षक शॉन मार्क बेलसेर हा जागीच ठार झाला तर ओमकार गायकवाड हा गंभीर जखमी झाला.

शॉन बेलसेर यास देवळाली कॅम्प छावानी हॉस्पिटल मध्ये दाखल केले तर ओमकार गायकवाड यास प्रथम बिटको हॉस्पिटल व नंतर खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल केले.

शॉन बेलसेर यास देवळाली कॅम्प छावानी हॉस्पिटल मध्ये दाखल केले तर ओमकार गायकवाड यास प्रथम बिटको हॉस्पिटल व नंतर खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल केले.

विशेष म्हणजे दोन्ही दुचाकी स्वराणी हेल्मेट परिधान केले होते. रात्री उशिरा देवळाली कॅम्प पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. शिक्षक शॉन मार्क बेलसेर हा आपल्या वृद्ध माते सोबत बॅन्स स्कुल परिसरात राहत असल्याचे समजते. रस्ता मोठा असतांना समोरासमोर धडक कशी आणि का झाली याचा पोलीस तपास करीत आहे. अधिक तपास देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शना खाली प्रकाश गिते करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *