मोटार सायकल चोर अटकेत….. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…..
सटाणा शहरातील मोटर सायकल चोरी करणारे दोन आरोपिंना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पालीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या पथकाने सटाणा तालुक्यात मोटर सायकल चोरी करणारे दोन संशयीतांना ताब्यात घेऊन मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले.
१० जुन रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचा समांतर तपास करीत असतांना सटाणा शहरात मोटर सायकल चोरी करणारे गुन्हेगार हे धुळे जिल्हयातील साकी परिसरात असल्याची बातमी मिळाल्याने पोलीस पथकाने साक्री तालुक्यातील लामकनी बसस्थानक परिसरात सापळा रचून संशयीत प्रदिप भरत पाटील, वय २५, रा. लोनखेडी, ता. साकी, जि. धुळे व मनोज पांडुरंग गायकवाड, वय २८, रा. लामकनी, ता.जि. धुळे यांना बजाज प्लॅटीना मोटर सायकल सह ताब्यात घेतले. कागदपत्रांबाबत विचारपुस केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. चौकशीत तिसरा साथीदार संशयित भुषण सुरेश मोहिते, रा. लोनखेडी, ता. साकी, जि. धुळे आदींनी मिळून सदरची मोटर सायकल डांगसौंदाणे, ता. सटाणा येथून चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपींची अधिक विश्वासात घेवून चौकशी केली असता, त्यांनी सटाणा,
देवळा, जायखेडा परिसरातुन ०३ मोटर सायकली चोरी केल्याचीही कबुली दिली आहे. आरोपींच्या ताब्यातून चोरीच्या ०३ बजाज प्लॅटीना मोटर सायकल व मोबाईल फोन असा एकुण किं. रू. १,१५,०००/- रूपये किं. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
देवळा, सटाणा व जायखेडा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले मोटर सायकल चोरीचे एकुण ०३ गुन्हे उघडकीस आलेले आहेत. आरोपींचा साथीदार भुषण सुरेश मोहिते, रा. लोनखेडी, ता. साकी, जि. धुळे हा कळवण पोलीस ठाण्यात मोटर सायकल चोरीचे गुन्हयात अटक असून वरील आरोपी प्रदिप पाटील व मनोज गायकवाड यांना गुन्हयाचे पुढील तपासकामी सटाणा पोलीस ठाणेस हजर करण्यात आले आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे, पोलिस उप निरीक्षक दत्ता कांभीरे, प्रशांत पाटील, सुधाकर बागुल, योगेश शेवाळे, पोना सुभाष चोपडा, दत्ता माळी, योगेश कोळी, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम यांचे पथकाने मोटर सायकल चोरीचे ०३ गुन्हे उघडकीस आणुन उत्कृष्ट कामगिरी केली आहे.