क्राईम ताज्या बातम्या

खून झालेल्या त्या युवकाची ओळख पटली

खून झालेल्या त्या युवकाची ओळख पटली

नाशिक रोड प्रतिनिधी :- येथील एकलहरे रोड परिसरात असलेल्या किर्लोस्कर कंपनी जवळ समोरच्या रस्त्यावर एका युवकाचा धारदार हत्याराने खून करण्यात आला असून सदरच्या युवकाची ओळख पटलेली असून त्याचे नाव चेतन टमके असल्याचे नाशिक रोड पोलिसांनी सांगितले.

आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला त्यानंतर ही घटना समजतात पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. खून झालेल्या ठमके चे वय साधारण 30 ते 35 असून तो विजय नगर सिडको या भागातील राहणारा आहे त्याचप्रमाणे या युवकाला या भागात कोणी आणले होते का तो स्वतःच आला होता याबाबतही पोलीस शोध घेत आहे युवकाच्या अंगावर धारदार शस्त्राने गंभीर वार करण्यात आले आहे. दरम्यान या खून प्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *