शिंदे गावात महिलेची चाकूने भोसकून खून…… आरोपीला टोल नाका येथून त्वरित अटक….
नाशिक पूणा रोड वरील नाशिक रोड परिसरातील शिंदे गावात एका 40 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की शिंदे गावतील शिवरत्न चौक येथे राहणारी जनाबाई भिवाजी बरदे या 40 वर्षीय महिलेची धार धार हत्याराने हत्या करण्यात आली आहे. संशयित आरोपी निकेश पवार याने घरात घुसून महिलेच्या गळ्यावर आणि पोटावर धार धार चाकूने वार करून हत्या करून फरार झाला. परिसरातल्या नागरिकांना चाकूचा धाक दाखवत आरोपी पसार झाला. गावातल्या नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांनी दिली. क्षणाचाही विलंब न करता माहिती मिळताच नाशिक रोड पोलिस घटनास्थळी दाखल होऊन आरोपी फरार असलेल्या मार्गाने रवाना झाले. संशयित आरोपी शिंदे गाव टोल नाका येथून ताब्यात घेतले आहे. नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत