अपहरण करून हत्या करणारा आरोपी २४ तासात अटक…. गुन्हेशाखा युनिट क. १ ची कामगीरी……
अपहरण करुन त्याची निघून हत्या करुन मोखाडा परिसरात नेऊन त्यास जाळून टाकणारा आरोपी २४ तासाच्या आत जेरबंद करुन गुन्हा उघडकिस आण्यत गुन्हे शाखा युनिट १ ला यश आले आहे.
पंचवटी पोलीस ठाण्यातील भादवि कलम ३६४, १२० ब, ३२३, ५०६, ३४ प्रमाणे १० फेब्रुवारी रोजी दाखल गुन्हयातील आरोपी हे फिर्यादी प्रितेश रमेश काजळे यांचा चुलत भाउ संदेश काजळे यास बळजबरीने कुठेतरी घेवुन फरार झाले होते.
गुन्हेशाखा युनिट क. १ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्हयातील आरोपी यांचा शोध घेत असतांना विशाल देवरे यांना गुप्त बातमी मिळाली की, गुन्हयातील आरोपी स्वप्निल उनव्हणे हा एका सिव्हर रंगाच्या विना नंबर प्लेट असलेल्या इको वाहनामध्ये त्रंबकेश्वर परिसरात फिरत आहे. सदरची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांना देऊन बातमीची खात्री करुन संशयित इसमास ताब्यात घेण्यासाठी गुन्हेशाखा युनिट क. १ चे पथकाने त्रंबकेश्वर परिसरात सापळा लावुन इको गाडी व संशयित स्वप्नील दिनेश उनव्हणे, वय-२३वर्षे, रा-ओमसाई निवास, निमाणी बसस्टॉप समोर, राजवाडा पंचवटी नाशिक यास ताब्यात घेतले.
केलेल्या गुन्ह्याबाबत खाकी दाखवताच त्याने रणजित आहेर, रा-राजवाडा पंचवटी नाशिक, नितीन उर्फ पप्पु चौघुले, रा-ड्रिम कॅस्टलच्या पाठीमागे, पंचवटी नाशिक, पवन भालेराव, रा-त्रंबकेश्वर राजवाडा जि. नाशिक यांनी मिळुन संदेश चंद्रकांत काजळे यास १० फेब्रुवारी रोजी रात्री १२/३० वाजेच्या सुमारास बळजबरीने याच गाडीत बसवुन त्यास रणजित आहेर व नितीन चौघुले यांनी कोयता व लोखंडे रॉडने मारहाण करून जखमी करून त्यास जिवे ठार मारून मोखाडा परिसरात नेवुन त्यास जाळून दिल्याची कबुली दिली. गुन्हयाची कबुली दिल्यावरून त्याचे कब्ज्यातुन ४,००,०००/-रूपये किंमतीची एक सिव्हर रंगाची मारूती सुझुकी कंपनीची इको विना नंबर प्लेट असलेली चारचाकी जप्त करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, सहायक पोलिस उप निरीक्षक रविंद्र बागुल, प्रविण वाघमारे, विशाल काठे, विशाल देवरे, आप्पा पानवळ, जगेश्वर बोरसे, समाधान पवार अशांनी केली आहे.