क्राईम ताज्या बातम्या

२४ तासात चोरी करणारा आरोपी अटकेत…… ९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत….. नाशिकरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

२४ तासात चोरी करणारा आरोपी अटकेत…… ९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत….. नाशिकरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई……

नाशिकरोड पोलीसांनी कारवाई करीत २४ तासाचत सुभाषरोड, नाशिकरोड येथे एका गोडाउन मधुन खताच्या गोण्या चोरी करणाऱ्या संशयितास २४ अटक करून ९,८३,२९८/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फिर्यादी जसबीर सिंग अमरीक सिंग यांच्या सुमाषरोड येथील खताच्या गोडाउन मध्ये चोरी झाल्याने नाशिकरोड पोलीस ठाण्यात भादवि कलम ३८०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे शोध पथकाचे टेमगर हे करत होते.

नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असतांना अरूण गाडेकर यांना गोपनीय बातमीदार मार्फतीने माहिती मिळाली कि, सुभाषरोड येथील गोडाउन मधुन खताच्या गोण्या चोरी करणारा संशयित हा माल धक्का येथे असल्याची माहिती मिळाल्याने लागलीच मालधक्का, देवळाली गाव येथे जाउन आकाश रामचंद्र चिकने ताब्यात घेतले असता त्याने त्याचे दोन साथिदारांसह चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. आकाश चिकन याला गुन्हयात अटक करून गुन्हयात चोरीस गेलेला १,८३,२९८/- रुपये किंमतीच्या ७४ गोण्या, ८,००,०००/- रू किमतीचा एक महींद्रा कंपनीचा FURIO 14 आयशर ट्रक क्रमांक MH 15 GV 4146
मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची उल्लेखानिय कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्मीक, पोलीस उप आयुक्त श्रीमती मोनिका राउत, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलिस निरीक्षक पवन चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, विजय टेमगर, विष्णु गोसावी, सागर आडणे, गोकुळ कासार, रोहित शिंदे, अरुण गाडेकर, मनोहर कोळी, नाना पानसरे, यशराज पोलन, संतोष पिंगळ, भाऊसाहेग नागरे, कल्पेश जाधव, रानडे आदींनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *