Homeक्राईमचोरीस गेलेले १६ लाख रुपयांचे २८ तोळे सोने जप्त..... नाशिकरोड पोलिसांची धडाकेबाज...
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

चोरीस गेलेले १६ लाख रुपयांचे २८ तोळे सोने जप्त….. नाशिकरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई….. एका आरोपी सह तीन सोनारांना अटक….. ७ गुन्हे उघडकीस

चोरीस गेलेले १६ लाख रुपयांचे २८ तोळे सोने जप्त…..
नाशिकरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई….. एका आरोपी सह तीन सोनारांना अटक….. ७ गुन्हे उघडकीस……

नाशिकरोड पोलीसांची कारवाईत सामनगांव येथे वयस्कर महिलेच्या डोक्यात वार करून जबरी चोरी करणाऱ्या अटक आरोपीकडून १६ लाख रुपयांचे २८ तोळे मुद्देमाल जप्त एकुण ०७ गुन्हे उघडकीस आणले आहे.
सामनगांव येथील महिला शकुंतला दादा जगताप वय ७५ वर्षेया दिनांक ०१ जानेवारी रोजी दुपारी १५:४५ वाजेचे सुमारास सामनगाव येथे दुकानात असतांना पांढ-या रंगाच्या मोपेड गाडीवरून आलेल्या एका अज्ञाताने दुकानात येवून त्याच्याकडे असलेल्या लोखंडी रॉडने त्यांना गंभीर दुखापत करून त्यांच्या अंगावरील सोन्याची पोत, व इतर दागिने असे एकुण ४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून नेले होते.
नाशिकरोड पोलीस ठाण्यात याबाबत भा.दं. वि. कलम ३९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळके आणि गुन्हयाच्या समांतर तपासात गुन्हे शाखा, युनिट ०१ च्या पथकाने संशयित आरोपी पप्पु उर्फ विशाल प्रकाश गांगुर्डे यास ताब्यात घेतले. अटक आरोपीने सुरुवातीस ०३ गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्यात चोरीस गेलेला माल आरोपीच्या पोलीस कोठडी दरम्यान केलेल्या तपासात पप्पु उर्फ विशाल प्रकाश गांगुर्डे याने वृध्द महिलेस मारहाण करण्यासाठी वापरलेले हत्यार वाहनांचे नट बोल्ट खोलण्यासाठी वापरायचा पान्हा/रॉड, प्लेजर मोटारसायकल क. एमएच १५ डीडब्ल्यू २२५ गुन्हयात जप्त करण्यात आली आहे. अधिक तपासात आरोपीने एकुण ०७ गुन्हे केल्याची कबुली दिली असून गुन्हयांतील चोरलेले सोन्याचे दागिने विक्री केलेले सोनार यांचा शोध घेवून सोन्याचे दागिने त्यात सोन्यांच्या मप्यांची पोत, सोन्याचे डोरले असलेली छोटी पोत, सोन्याचे कर्णफुल व वेल आदी एकुण २८ तोळे वजनाचे सोन्यांचे दागिने व लगड १६,५०,०००/- रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गुन्हयांत चोरीस गेलेले सोने खरेदी करणारे सोनार प्रशांत विष्णुपंत नागरे, हर्षल चंद्रकांत म्हसे, चेतन मधुकर चव्हाण या तिघांना गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णीक, पोलीस उप आयुक्त श्रीमती मोनिका सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके, पोलिस निरीक्षक पवन चौधरी, गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, विजय टेमगर, विष्णु गोसावी, सागर आडणे, गोकुळ कासार, रोहित शिंदे, अरूण गाडेकर, मनोहर कोळी, नाना पानसरे, यशराज पोतन, संतोष पिंगळ, भाऊसाहेब बागरे, कल्पेश जाधव, कोकाटे, सविन वाळूज, बोडके, रानडे, बच्चे आदींनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments