क्राईम ताज्या बातम्या

सहा अल्पवयीन चोरट्यांकडून पाच दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त,आडगाव पोलिसांची उत्तम कामगिरी

सहा अल्पवयीन चोरट्यांकडून पाच दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त,आडगाव पोलिसांची उत्तम कामगिरी..

नाशिक शहरातील चोरी गेलेल्या पाच मोटरसायकल पोलिसांनी अल्पवयीन चोरट्यांकडून जप्त केल्या आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मेडिकल कॉलेज फाटा येथे ही कारवाई केली. आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पेट्रोलिंग करत असताना चार संशयित व्यक्ती हे मेडिकल चौफुली जवळ चोरी गेलेल्या दोन मोटरसायकल विक्री करण्यासाठी येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार आडगाव पोलिसांनी शिताफीने संशियत व्यक्तीला ताब्यात घेतले.

आडगाव पोलिस सखोल तपास करत असताना या संशयिताने पंचवटी हद्दीतील मोटरसायकल चोरी केल्याचा गुन्हा कबूल केला. याप्रकरणी पोलिसांनी सहा संशयित ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण एक लाख पाच हजार रुपये किंमतीच्या पाच मोटरसायकल जप्त केल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *