आय.एस.पी, सी.एन.पी निवडणुकीत वाद….. दोन्ही पॅनल कडून एकमेका विरोधात तक्रार अर्ज दाखल..…
येत्या 20 जुलै रोजी आय एस पी आणि सी एन पी वर्कर्स कमिटी निवडणूक होणार आहे पण त्यापूर्वीच निवडणुकीला हिंसक वळण लागले असून आपल्या पॅनेलचे उमेदवार यांनी उपनगर पोलिस ठाण्यात विद्यमान जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी मोहन रावले यांना मारहाण केली म्हणून त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी तक्रार अर्ज दाखल केला.
कामगार पॅनलच्या वतीने उपनगर पोलिस ठाण्यात दोन तक्रार अर्ज दाखल करण्यात आले असून त्यात सोमवारी सकाळी आम्ही सी. एन. पी. मध्ये शुरू असलेल्या वर्कर्स कमेटी निवडणुकीच्या सुरू असलेल्या प्रोसेस मध्ये ‘कामगार पॅनल च्या आमच्या ग्रुपच्या एका उमेदवाराच्या नावासंबधी माहिती घेण्यासाठी निवडणूक अधिकारी पांच्या ऑफीस मध्ये जाण्यासाठी आले असता. ऑफीस बाहेर जमलेल्या मोहन रावळे, काशीनाथ पाटोळे व शेखर वाईकर यांनी कार्यकत्यांची गर्दी जमवून अर्वाच्य पद्धतीने निवडणूक अधिकायांना शिवीगाळ करणे व त्यांच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा आरोप केला आहे.
अधिक विचारणा केली असता वरील तिघांनी आम्हाल शिवीगाळ केल्याने वाद निर्माण आणि त्यांनी आम्हाल धक्का बुक्की करून मारहाण केली. त्यांनी दहशत निर्माण करण्याचा करून लोकांमधे आमच्या बद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे. आपल्या पॅनलच्या वरील तिघांवर कारवाई करण्यासाठी हिरामन मुरलीधर आव्हाड, अशोक तुकाराम अहिरे, जगदिश दत्तात्रय गोडसे यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केले आहे.
तरदुसऱ्या अर्जात आपला पॅनलचा उमेदवार असलेला एक उमेदवार पंकज तिवारी यांनी आम्हाला धमकावून सांगीतले कि, मैं तो यूपी बिहारसे भाई लोगों को युं बुला लूंगा। एक कट्टा साथ रहेगा बोलती बंद हो जायेगी। हमारे लिये मामूली चिज है। चलाना तो मैने सिख है इधर तो सबकी फाड दूंगा। यहाँ सारे बाहर वालो को इकठ्ठा करके सबकी बजाऊंगा। आप लोग क्या है मेरे सामने। आपको में देख लुंगा अशा पध्दतीने त्याने धमकी देवून आम्हाला घाबरवून इलेक्शनमधे भीतीचे वातावरण तयार केले आहे. तरी पोलिसांनी पंकज तिवारी यांच्याविरुद्ध करावी करण्याची मागणी संदिप व्यवहारे, दत्ता गांगुर्डे यांनी केली आहे.