क्राईम ताज्या बातम्या

विहितगव येथे वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ….. परिसरात भीतीचे वातावरण

विहितगव येथे वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ….. परिसरात भीतीचे वातावरण…….


उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील विहितगाव येथील रामकृष्ण हाऊसिंग सोसायटीत पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या दुचाकी तीन दुचाकींना आग लावून रस्त्यालगत उभे असलेल्या मालवाहू टेम्पो तसेच पांडुरंग गरेज जवळ उभ्या असलेल्या काही चार चाकी गाड्यांचे समाजकंटकांनी नुकसान केले.

गाड्यांची तोडफोड करत दुचाकी जाळत दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारा प्रकार सी सी टीव्ही मध्ये कैद झाले आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे संतप्त नागरिकांनी पोलिसां वरती रोष व्यक्त करत या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली सोबतच रात्रीची गस्त वाढवण्याची मागणीही केली आहे. अशा समाज विघातक घटना वारंवार घडू नयेत म्हणून प्रशासनाने योग्य ती खबरदारी न घेतल्यास नागरिकांनी आंदोलनाचा इशारा
दिला आहे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *