आर्टिस्ट तरुणीवर लैंगिक अत्याचार….. सोशल मीडियावर काम देण्याच्या बहाण्याने केले अत्याचार…..
लग्नाचे आमिष दाखवून आर्टिस्ट तरुणीवर दीड वर्ष लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार देणाऱ्या विवाहित तरुणाविरुद्ध नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत तरुणीला रील आणि नृत्याची आवड असल्याने तिने आपले अनेक व्हिडिओ इंस्टाग्राम सोशल मीडियावर पोस्ट केले होते. पीडित तरुणीला विनोद कुमावत याच्या इन्स्टाग्राम आयडीवरून “माझ्या अल्बममध्ये काम करण्याची ऑफर झाल्यानंतर दोघांचे मोबाईलवर बोलणे होऊन विनोद ऊर्फ सचिन तिला भेटायला तिच्या राहत्या घरी गेला.
भेटीत माझी विनोद कुमावत नावाची कंपनी असून, मी गाणी बनविण्याचे काम करतो. त्यासाठी मी सुंदर चेहऱ्याच्या शोधात असून, यापूर्वीही अनेक सुंदर मुलींना मी काम दिलेले आहे. याबाबत तुम्ही माझ्या अकाऊंटवर खात्री करू शकता. पीडित तरुणीला खात्री झाल्याने तिने होकार दिला. रोज होणाऱ्या भेटीत दोघांमध्ये मैत्री झाली. त्याने तिला लग्नाची मागणीही घातली. 5 सप्टेंबर 2022 रोजी गाण्याचे शूट संपल्यानंतर विनोद तिला सोडण्यासाठी घरी आला असता घरी कोणी नसल्याची संधी साधत तो तिच्याशी अंगलट करू लागला. त्याला विरोध करूनही त्याने जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतरही वारंवार फिर्यादी वर अत्याचार सुरूच ठेवले. परंतु लग्न करण्यात टाळाटाळ केली.
पीडितेच्या वडिलांनी सचिनच्या आईला लग्नाबाबत विचारले असता तिने दोन लाख रुपये हुंडा, पाच तोळ्यांची सोन्याची चेन व अंगठीची मागणी केली. आर्थिक परिस्थिती नसल्याने तिच्या वडिलांनी नकार दिल्यानंतर सचिनने तिला फोन करणे, अल्बममध्ये काम देणे बंद केले. फिर्यादी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु काहीच उत्तर .मिळत नव्हता. सचिनने 17 जानेवारी रोजी आपल्या सोशल मीडियावर फर्यदीला ब्लॉकही केले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी ने नाशिकरोड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हांडोरे करीत आहेत.