क्राईम ताज्या बातम्या

आम्रपाली झोपडपट्टी जवळ गावठी कट्टे बाळगणारे तीन जण ताब्यात…… सोमनाथ गुंड यांच्या गुप्त बातमीने उपनगर पोलिसांची कारवाई

आम्रपाली झोपडपट्टी जवळ गावठी कट्टे बाळगणारे तीन जण ताब्यात…… सोमनाथ गुंड यांच्या गुप्त बातमीने उपनगर पोलिसांची कारवाई…….

उपनगर पोलीसांनी २ गावठी बनावटीचे कटट्रे व ३ जिवंत काडतुसासह तीन आरोपींना ठोकल्या बेडया
२८ जानेवारी रोजी रात्रगस्तीत उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे जयंत शिंदे यांना उपनगर पोलीस ठाण्याचे सोमनाथ गुंड यांनी इच्छामणी लॉन्स, जवळील मैदानाजवळ, नाशिक पुणे रोडवर एक इसम गावठी कट्टा व काडतूस घेवून येणार असल्याची गुप्त बातमी मिळाल्याचे सांगितले. तत्काळ गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन चौधरी, शेख, जयंत शिंदे, अनिल शिंदे यांनी दोन संशयित आरोपींना त्यांच्या ताब्यातून १ गावठी कट्टा व १ जिवंत काडतुस सह ताब्यात घेतले. आरोपींना ताब्यात घेवून चौधरी, लखन, सुरज गवळी, कर्पे, राहुल जगताप, सौरभ लोंढे यांनी माहिती मिळवून आरोपींचा अजून एका साथीदार अटक करून त्याच्याकडून ०१ गावठी कट्टा व २ जिवंत काडतूस हस्तगत करून शुभम अशोक जाधव, सचिन धर्मा सोनवणे आणि गणेश जगदीश भालेराव उर्फ बॉबी या तिघांना अटक करण्यात आली आहे.


सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त मोनिका राउत मॅडम, सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद सपकाळे, पोलिस निरीक्षक बाबासाहेब दुकळे, सहायक पोलिस निरीक्षक सचिन चौधरी, लखन, इमरान शेख, जयंत शिंदे, अनिल शिंदे, सुरज गवळी, पंकज कर्पे, राहुल जगताप, सौरभ लोंढे, यांनी केली आहे.
गुन्हयाचा तपास पुढील तपास इमरान शेख हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *