नाशिकरोड पोलीसांची कारवाईत मोटारसायकल चोरटयास अटक…….०३ मोटारसायकल जप्त
नाशिकरोड परिसरातील देवळाली गाव अण्णाभाऊ साठेनगर येथे राहणारे दिलीप युवराज सपकाळे यांची हिरो होन्डा सीडी डॉन मोटारसायकल क्र. एम.एच. १५ बी.एफ. ३३०६ ही जेलरोड पाण्याची टाकी परीसरातून चोरी झाली गेली होती. याबाबत त्यांच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचा तपास गुन्हे शोध पथकाचे गोसावी हे करत आहेत. गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश शेळके व तपासी अंमलदार
गुन्हे शोधपथकामार्फत अज्ञात आरोपीचा व चोरीस गेलेल्या वाहनाचा शोध सुरू घेत असताना गुन्हे शोध पथकाचे गोसावी यांना गोपनिय बातमीदमार्फत माहिती मिळाली की रोशन संजय गोधडे वय-२३ वर्षे रा. अश्विनी कॉलनी सामनगाव रोड, नाशिकरोड याने गुन्हयातील वाहन चोरी केले आहे. नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीत संशयिताचा शोध घेत असतांना गुन्हेशोध पथकास नाशिकरोड बस स्टॅन्ड परिसरात तो फिरत असतांना मिळून आल्याने त्यास चौकशी कामी ताब्यात घेवून त्याच्याकडे विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपीस अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १९ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. आरोपीकडे सखोल चौकशी करून एक लाख तीस हजार रुपयांच्या एकुण ०३ मोटार सायकल जप्त करण्यता आल्या आहेत.
सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णीक, पोलीस उप आयुक्त श्रीमती मोनिका राउत, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, विजय टेमगर, विष्णु गोसावी, सागर आडणे, गोकुळ कासार, रोहित शिंदे, अरुण गाडेकर, मनोहर कोळी, नाना पानसरे, यशराज पोतन, संतोष पिंगळ, रानडे आदींनी केली आहे.