Homeताज्या बातम्याघरावरून गेलेल्या विजेच्या तारांमुळे सातपुरला विवाहिता गंभीर भाजली......
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

घरावरून गेलेल्या विजेच्या तारांमुळे सातपुरला विवाहिता गंभीर भाजली……

मनमाड येथून नाशिकला माहेरी आलेल्या विवाहिता ही घरावरून घरावरून गेलेल्या वीज तारांमुळे  गंभीर भाजल्याची घटना अशोकनगर, सातपूर येथे घडली आहे. मनमाड येथे राहणारी विवाहिता राणी दशरथ चव्हाण आजारी वडिलांना भेटण्यासाठी अशोकनगर सातपूर येथे आलेली होती. राणी चव्हाण ही  सोमवारी सायंकाळी धुतलेले कपडे काढण्यासाठी टेरेसवर गेली असता टेरेसवरून गेलेल्या वीज तारांना स्पर्श होऊन बसलेल्या धक्क्याने ती ५० ते ५५ टक्के भाजली आहे. कुटुंबीय आणि परिसरातील लोकांनी तिला तात्काळ नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. राणी चव्हाण हीची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान घरांवरून गेलेल्या मोकळ्या वीज तारा काढण्याबाबत परिसरातील लोकांनी वारंवार निवेदने देऊनही विद्युत मंडळ दखल घेत नसल्याने नागरिक प्रचंड संतप्त झाले आहेत. विद्युत् मंडळाचा भोंगळ कारभार आणि हलगर्जीपणा मुळे अजून किती दुर्दैवी घटना घडणार? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. ह्या सर्वसामान्य कुटुंबास शासकीय नियमानुसार मिळणारी मदत मिळावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments