बिटको येथील पेट्रोलपंपावर दहशत निर्माण करून दगडफेक करणारा आरोपी जेरबंद…..गुन्हेशाखा युनिट क २ ची कामगिरी….
नाशिकरोड बिटको पॉईंट जवळ असलेल्या पेट्रोमाईन पेट्रोल पंप कामगारावर काही दिवसांपूर्वी हॉटेल वास्को जवळ दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून पेट्रोल पंपावर येऊन हल्ला करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट २ ने ताब्यात घेतले आहे. फिर्यादी कामगार नियमित पणे काम संपवुन पेट्रोलपंप बंद करत असतांना यातील अनोळखी आरोपींनी पेट्रोलपंपावर पाच ते सहा जणांचा जमाव जमवुन फिर्यादी व त्यांचे सहकारी यांना वाईट साईट शिवीगाळ करून फिर्यादी यांना मारहान करून जीवे ठार मारण्याची तसेच पेट्रोलपंप जाळून टाकण्याची धमकी देवुन इतर लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी फिर्यादी व त्यांचे सहकाऱ्यांना चॉपरने मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने आरोपींना मज्जाव केला असता आरोपींनी बाहेर जावुन पेट्रोलपंपावर दगडफेक करून तेथुन पळुन गेले होते.
हल्ल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ०८ जुलै रोजी गुन्हेशाखा युनिट २ सदर गुन्हयाचा समांतर तपास करून गुन्हयातील आरोपींचा शोध घेत असतांना गुन्हेशाखा युनिट २ चे सुनिल आहेर व महेश खांडबहाले यांना हल्ल्यातील एक जण हा शिंदे टोल नाका याठिकाणी वावरत असल्याची गोपनीय बातमी मिळाली. तत्काळ पोलिसांच्या पथकाने शिंदे टोल नाका येथे संशयीत सुमित राकेश खरे वय २१ वर्ष, रा. शिल्पविहार अपार्ट, बि विंग नं.२०४, सिध्देश्वरनगर, दुर्गामाता मंदीराजवळ, नारायण बापु नगर, जेलरोड, नाशिकरोड याला ताब्यात घेतले. सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ कडील सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहायक पोलिस निरीक्षक समाधान हिरे, यशवंत बेंडकोळी, सहायक पोलिस उप निरीक्षक शंकर काळे, संजय सानप, सुनिल आहेर, प्रकाश बोडके, मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, परमेश्वर दराडे, वाल्मिक चव्हाण, प्रविण वानखेडे, महेश खांडबहाले, तेजस मते, सुनिल खैरनार आदींनी केली आहे.