सिंधी बांधवांच्या रामी भवन हॉल मध्ये भगवान झुलेलाल, गणपती आणि साईबाबा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून विधिवत स्थापना.
नासिक सिंधी पंचायत तर्फे तपोवन रोड येथील रामी भवन हॉल मध्ये सिंधी बांधवांचे कुलदैवत भगवान पूज्य झुलेलाल तसेच गणपती आणि साईबाबा मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून नासिक सिंधी पंचायतीतर्फे अनेक सामाजिक कार्य पार पडले आहेत. रामी भवन हॉल येथे भगवान पूज्य झुलेलाल यांची मूर्ती असावी अशी सर्वांचीच इच्छा होती. नासिक सिंधी पंचायतीचे अध्यक्ष अडवोकेट प्रकाश आहुजा यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने भाविकांची इच्छा पूर्ण केली. यासाठी रामी भवन येथे अनेक महिन्यांपासून सुशोभीकरण चे काम सुरू होते. सोमवारी 13 मार्च रोजी भगवान झुलेलाल, गणपती आणि साईबाबा यांच्या मूर्तींची विजय महाराज, सूरज महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
सिंधी पंचायतीचे रामी भवन हॉल हा शहराच्या अगदी मध्य स्थानी असून नासिक रोड, उपनगर, नाशिक, पंचवटी आदी भागांतून सिंधी बांधव दर्शनासाठी सहज पोहोचू शकतात. प्राणप्रतिष्ठेची सर्व विधी संपल्यानंतर सायंकाळी सर्व भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले होते. दर्शन घेतल्यानंतर भाविकांसाठी भव्य महा भंडाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या सेवकांचे स्वागत सत्कार करण्यात आले. गुढीपाडवा दिवशी 22 मार्च रोजी नाशिक येथे होणाऱ्या सभेसाठी महाराष्ट्र हिंदु महा सभेचे भारतानंद स्वामी सतीशजी महाराज, सुदर्शन न्यूज चे विवेकानंद दीक्षित, नासिक सुदर्शन न्यूज चे भारत गोसावी, सुमित मिश्राजी तसेच हिंदु महा सभेचे कार्यकर्त्यांनी हुतात्मा कान्हेरे मैदान येथे होणाऱ्या सभेसाठी हिंदु बांधवांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले. गुरुवार 23 मार्च रोजी भगवान झुलेलाल अवतरण दिवस चेट्रीचंड मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून रामी भवन ते डोंगरे वसती गृह पर्यंत निघणारी बाईक रली आणि इतर कार्यक्रमाविषयी भक्तांना माहिती देण्यात आली. यावेळी सुमारे दोन हजार भक्तांनी भगवान झुलेलाल यांचे दर्शन घेऊन महा प्रसादाचा लाभ घेतला. मूर्ती स्थापना कार्यक्रमासाठी नासिक सिंधी पंचायतीचे अध्यक्ष अडवोकेट प्रकाश आहुजा, शाम मोटवानी, हासानंद करमचंदानी, दीपक धीरवानी, शंकर जयसिंगानी, अनिल आहुजा, हेमंत भोजवानी, सतीश पंजवानी, महेश नागपाल आदी सेवाभावी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले