माथेफिरूचं घरात जाळपोळ करत आत्महत्याची धमकी……. नाशिकरोड पोलिसांनी सुखरूप ताब्यात घेतले……
माथेफिरू म्हटलं की तो काय करल याचा नेम नाही, स्वतः बरोबरच इतरांना देखील कसा त्रासदायक ठरू शकतो याचे उदाहरण आजची घटना. अशा घटनांमुळे किंबहुना जीवघेणा हि ठरू शकतो. असाच काहीसा प्रकार नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारत भूषण हाऊसिंग सोसायटीच्या मागे असलेल्या एका रो हाऊस मध्ये घडला आहे. नांदगाव तालुक्यातील कुसुमते गावातील 32 वर्षीय किशोर शांताराम पांडे या तरुणाला मानसिक आजाराने ग्रस्त असल्याने उपचारार्थ येथे राहणाऱ्या त्याच्या बहिणीच्या घरी आणण्यात आले. मात्र काल मध्यरात्रीपासून अचानक या तरुणाने आरडाओरड करत घरात धिंगाणा घालायला सुरुवात केली, सकाळी पुन्हा तो सामान्य व्यक्तींप्रमाणे वावरत असल्याने घरातले लोक जरा निर्धास्त झाले, मात्र अचानक सकाळी साडेदहा वाजेपासून पुन्हा या माथे फिरू नये रो हाऊस मधील वरच्या मजल्यावरील खोल्यांचे दरवाजे आतून बंद करून मोठमोठ्याने आरडाओरड सुरू केली व घरातील सामानांची तोडफोड करत फेकाफेक करू लागला व मी आता एक तासात स्वतःला संपवून टाकणार असे मोठे मोठे बोलू लागला.

घरच्यांना काही कळेनासे झाले ते देखील रडू लागले व आजूबाजूच्या लोकांना जमा करून त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला असता त्याने लोकांच्या अंगावर देखील घरातील वस्तू फेकत जीवघेणे हल्ले केले सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही, बघता बघता परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून घरच्या मंडळींनी नाशिक रोड पोलिसांना संपर्क केला. प्रसंगावधान राखत नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके व गुन्हे शोध पथक तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वेळ न दवडता सदर ठिकाणी पोहोचले आणि मग सुरू झाला या तरुणाचं रेस्क्यू ऑपरेशन, हा माथेफिरू असलेल्या वरच्या खोलीकडे पोलीस जात असताना त्याने पोलिसांच्या दिशेने आक्रमक पद्धतीने हल्ला चढवत मुसळी व इतर भांडे भिरकवले व जवळ आलात तर मी स्वतःला आग लावून घेईल असे तो सांगू लागला मात्र नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके व गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत अगदी सावध पावलं टाकत या व्यक्तीचं मन परिवर्तित करण्याचा प्रयत्न केला.
सदर ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन मध्ये पोलिसांसोबत अग्निशामक दलाचे कर्मचारी देखील प्रयत्न करू लागले असताना माथेफिरूने वरती असलेल्या कपड्यांना आग लावण्यास सुरुवात केली आणि सर्वत्र धुराचा लोट पसरला मग मात्र आता समोर जात परिस्थिती नियंत्रणात अन्याय शिवाय काही पर्याय उरला नव्हता तात्काळ पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने फायर ब्रिगेड कर्मचाऱ्यांना पाण्याचा प्रेशर सुरू करायला सांगितला व वर लागलेली आग विझवत या तरुणावर देखील पाण्याचा फवारा मारण्यात आला ज्यामुळे या माथेफिरूचे लक्ष विचलित झालं आणि मग नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या जवानांनी माथेफिरूला ताब्यात घेतले. खबरदारीची उपाययोजना म्हणून त्याचे हातपाय बांधण्यात बांधून ताब्यात घेत रुग्णवाहिकेतून नेण्यात आले.
नाशिक रोड पोलिसांच्या समय सुचकतेमुळे एका माथेफिरू का होईना पण तरुणाचा जीव वाचवण्यात पोलिसांना यश आले. परिसरातील सर्व नागरिकांनी नाशिक रोड पोलिसांच्या धाडसाचे कौतुक केले. यावेळी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके गुन्हे शोध पथकाचे विष्णू गोसावी, रोहित शिंदे, भूषण सूर्यवंशी, अंबादास केदार, गोकुळ कासार, कल्पेश जाधव, भाऊसाहेब चित्तर, संदीप पवार, सागर आडणे, दत्तात्रय वाजे, प्रमोद ढाकणे, आदींसह पोलीस कर्मचारी व अग्निशामक दलाचे जवान उपस्थित होते.


